Cow Slaughter esakal
देश

Karnataka : भाजपला पुन्हा दणका; गोहत्याबंदी-धर्मांतर कायद्यात होणार बदल; खर्गेंनी दिली महत्वपूर्ण अपडेट

राज्यात शांतता-सौहार्दपूर्ण वातावरण असावे, हा काँग्रेस सरकारचा उद्देश असेल.

सकाळ डिजिटल टीम

टिपू सुलतानसह अन्य काही महत्त्‍वाच्या विषयांना कात्री लावण्याची शिफारस या समितीने केली होती. या शिफारसीला विरोधी पक्ष काँग्रेससह धर्मनिरपेक्ष पक्षानेही विरोध दर्शविला होता.

बंगळूर : भाजपने केलेल्या गोहत्याबंदी (Ban on Cow Slaughter), धर्मांतर यासारखे जनविरोधी कायदे मागे घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी दिली. बुधवारी (ता. २४) विधानसौधमध्ये पत्रकारांसमोर ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘यापूर्वी काँग्रेसने (Congress) गोहत्याबंदी, धर्मांतराला पुष्टी दिली तरी भाजप सत्तेवर आल्यानंतर गोहत्याबंदी, धर्मांतराला निषेध दर्शवून कायदे जारी केले आहेत. आता हे कायदे मागे घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याचे काँग्रेस सरकारचे प्रयत्न आहेत. पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमातही सुधारणा करू.

भाजप सरकाच्या घोटाळ्यांची चौकशी सुरू

जनतेला जाचक ठरणारे कायदे असल्यास ते मागे घेण्यात येतील. राज्यात शांतता-सौहार्दपूर्ण वातावरण असावे, हा काँग्रेस सरकारचा उद्देश असेल. विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्‍टिकोन निर्माण करण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न असेल. भाजप सरकाच्या घोटाळ्यांची चौकशी सुरू असल्याचे काँग्रेस नेतेमंडळींनी यापूर्वीच म्हटले आहे. मंत्री खर्गे यांनीही याचा पुनरुच्चार केल्याने राजकीय गोटात खळबळ माजली आहे.

भाजप सरकारच्या काळात पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमासाठीच्या चक्रतीर्थ यांच्या नेतृत्वात समिती नेमली होती. टिपू सुलतानसह अन्य काही महत्त्‍वाच्या विषयांना कात्री लावण्याची शिफारस या समितीने केली होती. या शिफारसीला विरोधी पक्ष काँग्रेससह धर्मनिरपेक्ष पक्षानेही विरोध दर्शविला होता. परंतु, भाजप सरकारच्या दबावाला बळी पडून पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमात बदलला होता. त्याला जनतेचाही विरोध झाला होता.

पुरावे देण्याची मागणी

भाजप सरकारने भ्रष्टाचार केला, हे मान्य करण्यास भाजपचे कोणीच तयार नाहीत. उलट भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यानिशी सिद्ध करा, असे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणत असल्याचे मंत्री खर्गे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT