Will Government ban rice exports after wheat and sugar Will Government ban rice exports after wheat and sugar
देश

सरकार तांदळाच्या निर्यातीवर आणणार बंदी? विश्लेषक म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

गहू व साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर मोदी सरकारचे (Government) तांदळाच्या (rice) निर्यातीवरही बंदी घालू शकते. भारताने तांदूळ निर्यातीवर बंदी घातली तर जागतिक अन्न सुरक्षेवर घातक परिणाम होऊ शकतो. कारण, भारताची गणना जगातील सर्वोच्च तांदूळ उत्पादकांमध्ये केली जाते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. (Will Government ban rice exports after wheat and sugar)

भारताने (Government) गहू आणि साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी जागतिक बाजारपेठेला धक्का देण्यापेक्षा कमी नाही. रशिया आणि युक्रेन युद्धात अडकले असताना भारतातून गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये अन्न पुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे.

भारत सरकार खाण्यापिण्याच्या किमती नियंत्रित करण्यासाठी विविध पावले उचलत आहे. हे लक्षात घेऊन भारताने गहू आणि साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहे. भारताकडून गव्हावर बंदी घातल्यानंतर अनेक देशांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत.

सरकारने (Government) आधीच गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तांदळाच्या (rice) निर्यातीवर बंदी (exports) घालण्याचा विचार केला जाऊ शकतो. अशा निर्बंधांमुळे देशातील खाद्यपदार्थांच्या किमती कमी होतील की नाही हे पाहण्याचे आव्हान असेल आणि तसे असेल तर कोणत्या कालावधीत, असे येस बँक लिमिटेडच्या अर्थतज्ज्ञ राधिका पिपलानी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

तांदळाचा पुरेसा साठा

भारताने पुरेशा प्रमाणात तांदळाचा साठा केला आहे. त्यामुळे भाव नियंत्रणात आहेत. तांदूळ (rice) आणि गहू भारतीय आहारात अधिक योगदान देतात. याशिवाय सरकारची अन्नधान्य रेशन व्यवस्था देखील यावर अवलंबून आहे. सरकारच्या अन्न साहाय्य कार्यक्रमासाठी गव्हाची राज्य खरेदी मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आणखी तांदूळ वितरित करण्याचा सरकारचा विचार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

SCROLL FOR NEXT