Arvind Kejriwal PM Narendra Modi sakal
देश

Arvind Kejriwal: "...तर PM मोदी राजीनामा देणार का?"; मुख्यमंत्री निवास प्रकरणावरुन केजरीवालांचा थेट सवाल

मुख्यमंत्री निवास घोटाळा प्रकरणी सीबीआनं चौकशी सुरु केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संघटक अरविंद केजरीवाल हे सध्या अडचणीत आले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसाठीच्या नव्या निवासाची आणि डागडुजीच्या कामांची सीबीआय चौकशी करणार आहे. पण या चौकशीत काहीही आढळलं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का? असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. (Will PM Modi resign Arvind Kejriwal question on Delhi CM residence CBI enquiry)

केजरीवालांनी सोडलं मौन

मुख्यमंत्री निवास सीबीआय चौकशी प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी या प्रकरणावरुन मौन सोडलं. भाजपनं आरोप केला होता की या कामासाठी ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. दिल्लीचे नायब राज्यपाल यांनी देखील याबाबत सीबीआयकडं तक्रार अर्ज केला होता. (Latest Marathi News)

कोणासमोरही झुकणार नाही

केजरीवाल म्हणाले, सीबीआयच्या चौकशीचं स्वागत आहे, कारण त्यांना या चौकशीत काहीही चुकीचं आढळणार नाही. या प्रकरणाची चौकशी पहिल्यांदाच होत नाहीए. त्यामुळं अशा प्रकारच्या कितीही फेक चौकशा झाल्यातरी मी कोणासमोरही झुकणार नाही. (Marathi Tajya Batmya)

मोदी अस्वस्थ झालेत

पंतप्रधान सध्या अस्वस्थ झाले आहेत, माझ्याविरोधात ही पहिली चौकशी नाही. त्यांनी यापूर्वीच ५० हून अधिक चौकशा केल्या आहेत. काहीवेळा त्यांना वाटलं होतं की आमच्या दारु धोरणात घोटाळा झाला आहे. त्यानंतर बसेस, शाळा आणि रस्त्यांतही घोटाळा झाल्याचं ते सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT