Child Burnt e sakal
देश

धक्कादायक! पती म्हणाला निष्ठा सिद्ध कर, पत्नीने मुलीलाच जिवंत जाळलं

सकाळ डिजिटल टीम

स्वतःला पतीव्रता सिद्ध करण्यासाठी एका आईनं आपल्या पोटच्या मुलीला जीवंत जाळल्याचा धक्कादायक (Crime News) प्रकार समोर आला आहे. या १० वर्षीय मुलीचा आज मृत्यू झाला असून याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी (Chennai Police) ३८ वर्षीय महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे. ही घटना तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) घडली आहे.

एकाला सोडून दुसऱ्याशी लग्न अन् ...

मृत मुलगी पवित्रा ही पाचवीची विद्यार्थिनी होती. ती तिची आई जयलक्ष्मी आणि तिचे सावत्र वडील पद्मनाभन सोबत राहत होती. जयलक्ष्मी १९ वर्षांची असताना तिनं पल्वाननसोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगी झाली होती, ती आता नर्सिंगची विद्यार्थिनी असून आपल्या आजी-आजोबांसोबत तुतीकोरीन येथे राहते. काही दिवसानंतर जयलक्ष्मीनं पल्वाननला सोडलं आणि त्याच्या लहान भाऊ दुरईराजसोबत लग्न केलं. त्यानंतर दोघेही मुंबईला गेले. तिथे त्यांनी पवित्राला जन्म दिला. पण, जयलक्ष्मीने त्या पतीला देखील सोडलं.

मुलीला झोपेतून उठवलं अन्...

जयलक्ष्मी मुंबई सोडून तामिळनाडूतील थिरुवोत्तीयुर येथे राहू लागली. तिथे घटस्फोटीत टँकर चालक पद्मनाभन नावाच्या व्यक्तीसोबत मैत्री केली. त्यांनी ९ वर्षांपूर्वी लग्न केले. त्यांना आता सहा आणि चार वर्षांची दोन मुले आहेत. पद्मनाभन हा दारू पिऊन तिच्याशी नेहमी भांडण करायचा. तसेच तिच्यावर आणि तिच्या पतीव्रतेवर नेहमी शंका घ्यायचा. त्याने रविवारी देखील जयलक्ष्मीसोबत भांडण केले आणि पतीवरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी मुलीला पेटवायचं आव्हान दिलं. त्यानंतर जयलक्ष्मी घरात गेली आणि तिनं झोपेत असलेल्या पवित्राला बाहेर आणलं. तिच्यावर रॉकेल ओतलं आणि तिला जीवंत जाळलं. हा धक्कादायक प्रकार पाहून शेजारी धावून आले. त्यांनी आग विझवत तिच्या अंगावर कपडे टाकले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. त्याचठिकाणी तिचा आज सकाळी मृत्यू झाला.

पोलिसांनी जयलक्ष्मी आणि त्यांचे पती पद्मनाभन यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून तुरुंगात पाठवले. याप्रकरणी अधिक तपास चेन्नई पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT