देश

नवरीने मांडवातच लग्न मोडलं, वरातीला बनवलं बंधक

नेमकं काय घडलं?

दीनानाथ परब

प्रयागराज: लग्न (wedding) हा कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. तिने या दिवसासाठी काही स्वप्न पाहिलेली असतात. वधू आणि वर या दोघांसाठी हा दिवस खास असतो. नवरीमुलीला आपल्या भावी जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. पण काहीवेळा भ्रमनिरास होतो. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये लग्न लागण्याच्या काही वेळ आधी नवरदेवाचा खरा चेहरा वधूच्या समोर आला, आणि त्यानंतर तिने क्षणाचाही विलंब न लावत लग्न मोडण्याचा (break marriage) निर्णय घेतला. (Woman calls off wedding after groom his friends turn up drunk baraatis held hostage)

विवाह मंडपात काय घडलं?

लग्नाची जोरात तयारी सुरु असताना नवरदेव त्याच्या मित्रपरिवारासह दारु पिऊन तिथे पोहोचला. नवरदेव आणि त्याचे मित्र दारु पिऊन विवाहमंडपात आले. त्यांची थट्टा मस्करी सुरु होती. त्याकडे नवरीमुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले. पण 'जयमाला' विधीच्याआधी नवरदेवाने नवरीमुलीला त्याच्यासोबत नृत्य करण्यासाठी जबरदस्ती केली. त्यावेळी मात्र परिस्थिती बिघडली. नवरीच्या नकाराने नवरदेवाला राग आला व विवाह मंडपातच वाद सुरु झाला.

नवरदेवाच्या वर्तनामुळे नवरी मुलीने लग्न मोडले व वरासह त्याच्या कुटुंबीयांना बंधक बनवून ठेवलं. लग्न ठरलं, त्यावेळी दिलेल्या भेटवस्तू परत करण्याची मागणी केली. नवरदेवाकडच्या माणसांनी पोलिसांना बोलवलं. त्यांच्याकडे मध्यस्थीची मागणी केली. पण नवरी ऐकायला तयार नव्हती.

प्रयागराजमधील प्रतापगड शहरातील तिकरी गावात ही घटना घडली. तिकरी गावातील शेतकऱ्याने रविंद्र पटेल नावाच्या मुलाबरोबर मुलीचे लग्न ठरवले होते. नवरदेवाच्या कुटुंबीयांनी रोख रक्कम आणि भेटवस्तु परत करण्याची तयारी दाखवल्यानंतर हा वाद मिटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT