viral
viral sakal
देश

भारत-चीन सीमा प्रतिबंधित क्षेत्रात बांधलयं घर, महिला स्वत:ला देवी पार्वती समजते

सकाळ डिजिटल टीम

सध्या भारत-चीन सीमेजवळील नाभिधांग या प्रतिबंधित क्षेत्रात राहणारी महिला चर्चेचा विषय ठरली आहे. ती हे प्रतिबंधित ठिकाण सोडण्यास तयार नाही. तिचे या मागील कारण ऐकूण तुम्ही थक्क व्हाल. ही महिला स्वत:ला देवी पार्वतीचा अवतार असल्याचे सांगते. त्यामुळे तीने हे ठिकाण सोडण्यास नकार दिला. (woman from Lucknow who has been staying illegally in a restricted area of Nabhidhang close to the Indo-China border.)

या महिलेचे म्हणणे आहे की, ती स्वत: देवी पार्वतीचा अवतार आहे आणि कैलास पर्वतावर राहणाऱ्या भगवान शिवशी लग्न करणार आहे. तेथील प्रशासन या महिलेला या प्रतिबंधित क्षेत्रातून हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ( woman claimed that she is incarnation of Goddess Parvati and will wed Lord Shiva who lives on Mount Kailash.)

प्रतिबंधित भागात राहणारी महिला लखनऊची रहिवासी असून हरमिंदर कौर असे या महिलेचे नाव आहे. ती लखनऊच्या अलीगंज भागात राहते. परवानगी घेऊन ती या प्रतिबंध क्षेत्रात 15 दिवसांसाठी गेली होती पण अचानक ती प्रतिबंधित क्षेत्रातच राहू लागली. आता ती तेथून परत जाण्यास नकार देत आहे.

पिथोरागढचे एसपी लोकेंद्र सिंह यांनी सांगितले की या प्रतिबंधित क्षेत्रातून हरमिंदर कौरला बाहेर काढण्यासाठी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले होते. मात्र पोलीस पथक तिला आणण्यात अपयशी ठरल्याने निराश होऊन परतावे लागले. पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, महिलेने टीमला धमकी दिली की, जर तुम्ही तिला जबरदस्तीने घेऊन गेले तर ती आत्महत्या करेल.

आता दुसरी टीम पाठवण्यात येणार असल्याचे लोकेंद्र सिंह म्हणाले. ती जर येण्यास तयार नसेल तर तिला बळजबरीने आणले जाईल.

ही महिला देवी पार्वतीचा अवतार असल्याचा आणि भगवान शिवशी लग्न करण्यासाठी आली असल्याचा दावा करत असल्याने ती मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्याचे एसपीचे म्हणणे आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT