crime news  sakal
देश

Video Call वर बोलताना आईची आत्महत्या; आठ वर्षांच्या मुलाकडून धक्कादायक खुलासा

सकाळ डिजिटल टीम

Jharkhand Dhanbad Woman Commits Suicide : धनबादच्या निरसा पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी रात्री उशिरा 27 वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही, मात्र महिलेने तांत्रिकाच्या प्रभावाखाली येत आत्महत्या केल्याचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेनंतर संबधित महिलेल्या आठ वर्षीय मुलाने धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचा पती राजू कुमार चौहान हे आयटीबीपीमध्ये असून सध्या त्यांची पोस्टिंग उत्तराखंडमध्ये आहे.

मोबाईल जप्त

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत महिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धनबादला पाठवला असून, पोलिसांनी मृत महिलेचा मोबाईल जप्त केला आहे. ही महिला तिच्या 8 वर्षांच्या मुलासोबत भाड्याच्या घरात राहत होती. चौकशीदरम्यान मृत महिलेच्या मुलाने सांगितले की, आई तांत्रिक बाबाशी फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलत होती. फोनवर बोलत असताना अचानक आई बेडरूममध्ये आली आणि पंख्याला ओढणी बांधून फास घेतला.

मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारचे नागरिक धावत आले त्यावेळी संबंधित महिला फासावर लटकलेली आढळून आली. त्यानंतर याची माहिती घरमालक आणि कुटुंबीयांना देण्यात आली. तपासादरम्यान पोलीस त्या तांत्रिकाच्या घरी पोहोचले मात्र तांत्रिक बेपत्ता होता. ध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, मृत महिलेच्या कॉल रेकॉर्डच्या आधारे तांत्रिक आणि महिलेमध्ये काय संभाषण झाले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांचेही सहकार्य घेण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT