राजस्थान : पतीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नीने (woman committed suicide) पाच निष्पाप मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आई आणि पाच मुलींचे मृतदेह (Five Girls Died) एक एक करून विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ही घटना रविवारी उघडकीस आली. हा प्रकार कोटा येथील चेचट पोलिस स्टेशन हद्दीतील काल्याखेडी गावात घडला. घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत आई बदामबाई बंजारा (४५) या कालीखेडी गाव, जि. कोटा, राजस्थान (Rajasthan) येथील रहिवासी आहेत. बदामबाई यांना १४ वर्षांची मुलगी सावित्री, सात वर्षांची अंजली, पाच वर्षांची काजल, तीन वर्षांची गुंजन आणि एक वर्षाची निष्पाप मुलगी रचना आहे. या सर्वांचे मृतदेह पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढले आहेत. तसेच त्यांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.
मृत बदामबाई बंजारा यांचे पती शिवलाल याची पोलिस स्टेशन चौकशी करीत आहे. या घटनेत मृत बदामबाई बंजारा यांच्या दोन मुली गायत्री व पूनम या जिवंत आहेत. त्या घटनेच्या वेळी घराबाहेर होत्या. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. गावातील नागरिक शोक व्यक्त करीत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
घरगुती वाद घटनेस कारणीभूत
पतीसोबत भांडण आणि घरगुती वाद (family Dispute) या घटनेस कारणीभूत असल्याचे दिसून येते. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे आईने पाच मुलींना घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, असे कोटा जिल्हा ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पारस जैन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.