woman constable traffic carrying her baby 
देश

दीड वर्षाच्या मुलासह महिला कॉन्स्टेबल ड्युटीवर; ट्रॅफिक कन्ट्रोल करतानाचा व्हिडिओ व्हायरल

सकाळन्यूजनेटवर्क

चंदीगड- चंदीगडमध्ये शुक्रवारी ट्रॅफिक पोलिसमधील एक महिला कॉन्स्टेबल आपल्या दीड वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आपली ड्यूटी बजावताना दिसून आली. या महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक आणि शेअर केले आहे. शिवाय या महिलेचे सोशल मीडियातून कौतुक होत आहे. व्हिडिओ शुक्रवारी सकाळी 11 वाजताचा असून चंदीगड ट्रॅफिक पोलिसातील महिला कॉन्स्टेबल प्रियंका चंदीगड सेक्टरच्या 15-23 चौकात आपली ड्यूटी करत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे दीड वर्षाचे बाळ सुद्धा होते. त्यांनी बाळाला कंबरेवर घेऊन ट्रॅफिकचे नियंत्रण केले. 

प्रियंकाच्या या कृतीला लोकांनी केला सलाम

बाळाला घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या ट्रॅफिक पोलिस महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांच्या उत्साहाला सलाम केला आहे. सोशल मीडिवर लोक त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. प्रियंका यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, माझं बाळ लहान आहे. माझ्याशिवाय ते घरी निट राहात नाही. अनेकदा माझे पती किंवा कुटुंबीय बाळाला घेऊन माझ्या ड्यूटीच्या ठिकाणी येतात. बाळ रडू लागलं तर मी काही काळासाठी त्याला उचलून घेते. पण, ड्यूटीमध्ये कोणतीही कसुर करत नाही.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

चंदीगडमध्ये शुक्रवारी एक महिला कॉन्स्टेबल आपल्या लहान बाळाला घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करताना दिसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. काही लोकांनी त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. 

चंदीगड पोलिस ट्रॅफिक विंगमध्ये मोठ्या प्रमाणात महिला पोलिस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. त्यांची ड्यूटी अनेकदा ट्रॅफिक कंट्रोल आणि वीआयपी मुव्हमेंट दरम्यान लावली जाते. शुक्रवारी शहरच्या सेक्टर 15-23 चौकात हॉटेल माऊंटव्यू भागात तैनात असणाऱ्या कॉन्स्टेबल प्रियंका यांनी आपल्या दीड वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन ट्रॅफिक कंट्रोल केलं. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT