woman cop thrashes father in law delhi police cop catched in cctv cam registured case against sub inspector  esakal
देश

VIDEO | पीएसआय महिलेकडून सासऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस महिली ज्येष्ठ व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे.

धनश्री ओतारी

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस महिली ज्येष्ठ व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ दिल्लीमधील असून ती पोलिस महिल पीएसआय आहे. ती सासऱ्याला मारहाण करताना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.(woman cop thrashes father in law delhi police cop catched in cctv cam registured case against sub inspector)

दिल्ली येथील लक्ष्मी नगरमध्ये ही घटना घडली. आपल्या सासऱ्यासोबत पीएसआय महिलेचा वाद सुरु होता. त्यावेळी तिंथ तिने आपल्या आईसह पोलिसांनादेखील बोलावून घेतले. यादरम्यान वाद वाढत राहिला. मात्र, यावेळी पोलीस शांतपणे उभा होता. दरम्यान, महिलेने सासरच्या मंडळींना मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये महिलेची आई वृद्धांना मारहाण करताना दिसत आहे.

मात्र, पोलिसांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ही घटना रविवारी घडली असल्याचे सांगितली जात आहे. याप्रकरणी आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला पोलिस अधिकारी दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक आहे. सासू-सासऱ्यांसोबत आधीच वाद सुरू असून, सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासऱ्याला मारहाण करणारी पीएसआय महिला डिफेंस कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहे. पहिल्यांदा ती आपल्या सासु सासऱ्यांसोबत राहत होती. मात्र, वादविवादानंतर पीएसआय महिला वेगळं राहू लागली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला उपनिरीक्षकाविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT