woman crushing a puppy with her feet up at up video viral 
देश

महिलेने कुत्र्याच्या पिल्लांना सँडल्सच्या हिल्सने चिरडले

वृत्तसंस्था

(उत्तर प्रदेश): एका महिलेने सॅंडल्सच्या हिल्सने कुत्र्यांच्या दोन पिल्लांना चिरडले असून, त्यांचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या क्रुरतेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला मोटारीमध्ये बसलेली आहे आणि ती आपल्या पायाने कुत्र्याच्या पिल्लाला चिरडत आहे. पहिल्यांदा ती पायाने हळूहळू त्याच्यावर जोर देत आहे. त्यानंतर पूर्ण ताकद लावून सँडल्सच्या हिल्सने त्याला चिरडते. यावेळी पिल्लू जोरजोरात ओरडताना दिसते. दुसऱया एका व्हिडिओमध्येही दुसऱ्या पिल्लाही त्याचप्रमाणे पायाने चिरडून मारण्याचा प्रयत्न करते. सँडल्सच्या हिल्सने चिरडल्यामुळे पिल्लांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेवर नेटिझन्सनी टीका सुरू केली आहे. लखनौ शहरातील ओमेक्स सिटीमध्ये राहणाऱया महिलेच्या विरोधात प्राणी मित्र संघटनेनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिकारी संजय शुक्ला यांनी सांगितले की, 'महिलेच्या विरोधात तक्रार दाखल झाली असन, लवकरच या महिलेला ताब्यात घेण्यात येईल. महिलेविरोधात आयपीसी कलम 429 आणि अॅनिमल क्रुएलिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल असून, पुढील तपास करत आहोत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

SCROLL FOR NEXT