Wearing Bikini  
देश

Viral Video: खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणी चक्क बिकीनी घालून आत शिरली; प्रवाशांनी काय केलं पाहाच!

Woman Enters Bus Wearing Bikini: सोशल मीडियावर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे सांगता येत नाही.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सोशल मीडियावर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे सांगता येत नाही. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी काहीतरी विचित्र कृती करत असल्याचे तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारयल होत आहे. एक महिला पब्लिक बसमध्ये चक्क बिकीनी घालून आल्याने लोकांचा गोंधळ उडाला होता. (Woman Enters Crowded DTC Bus Wearing Bikini Makes Obscene Gesture At Passenger viral video)

काही लोक सर्वसीमा पार करतात. असाच हा प्रकार आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. दिल्लीमधील ही घटना आहे. सध्या या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, महिला बिकीनीमध्ये बसमध्ये प्रवेश करते. ज्यावेळी ती बसमध्ये येते तेव्हा तिला एक महिला विचारते की तू ठीक आहेस ना? पण, बिकीनीमधील महिला दुसऱ्या महिलेशी वाद घालत असल्याचं दिसतं.

महिला बिकीनीमध्ये आल्याने बसमधील काही पुरुषांचा संकोच झाल्याचं दिसतं. ते आपल्या जागेवरुन उठून दुसरीकडे बसत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. बिकीनी परिधान केलेल्या महिलेने काही आक्षेपार्ह हावभाव केल्याचं देखील सांगितलं जातं. बसमध्ये बसलेल्या इतर प्रवाशांचा देखील गोंधळ उडाला होता. महिलेच्या अशा पेहरावामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले होते, शिवाय अनेकांना धक्का बसला होता.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी काही पाऊलं उचलता येतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. दिल्लीमध्ये डीटीएस बस महत्त्वाच्या प्रवाशी वाहतुकीच्या साधन आहेत. दिल्लीमध्ये महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची मुभा आहे. अशा घटनांमुळे सामाजिक वातावरण खराब होते असं काहीचं म्हणणं आहे. (Viral Video News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Negative Energy Remedies: आजपासून चातुर्मास सुरू, रात्री करा 'हे' चमत्कारिक उपाय, नकारात्मकता राहील दूर

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

SCROLL FOR NEXT