woman gives birth walking down the street as baby at china video viral 
देश

महिलेची चालता-चालता प्रसुती; व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

बिजिंग (चीन) : एक गर्भवती महिला रस्त्याने चालत असतानाच तिला कळा येऊ लागल्या आणि रस्त्यातच तिने बाळाला जन्म दिला. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, गर्भवती महिलेसोबत एक वृद्ध व्यक्ती होती. दोघे जण रस्त्याने चालत होते. महिलेला कळा येऊ लागल्या आणि बाळाला जन्म दिला. यानंतर महिला जोरजोरात रडायला लागली. यानंतर नागरिक गोळा झाले आणि त्यांनी मदत केली. महिला आणि बाळाची प्रकृती चांगली आहे. स्थानिकांनी सांगितले की, गर्भवती महिला रुग्णवाहिकेची वाट पाहात होती. पण, रुग्णवाहिका वेळेत पोहचू शकली नाही. शिवाय, त्या महिलेने विविध वाहनधराकांकडे मदत मागितली होती. पण, मदत न मिळाल्यामुळे ही वेळ आली.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, चेन असे गर्भवती महिलेचे नाव असून, सबंधित घटना 4 मे रोजी घडली आहे. रस्त्यातच बाळाचा जन्म झाल्यामुळे बाळ वाचू शकणार नाही, असे महिलेला वाटत होते. पण, सुदैवाने दोघांची प्रकृती चांगली आहे. व्हिडिओमध्ये महिलेची प्रसुती झाल्यानंतर नागरिक मदतीसाठी धावपळ करत असल्याचे दिसत आहे. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update : भरधाव कारने ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT