Woman who saved young man
Woman who saved young man  
देश

नारीशक्ती! लेकूरवाळ्या महिलेने जीव धोक्यात घालून वाचवला बुडणाऱ्या युवकाचा प्राण

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमधील नझिराबाद पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी संध्याकाळी कामावरून घरी परतणारे दोन तरुण ओव्हरफ्लो ओढ्याच्या पाण्यात वाहून जात होते. हे दृश्य पाहून शेजारी राहणाऱ्या एका महिलेने आपल्या काखेतील बाळाला खाली उतरवून स्वतः ओढ्यात उडी घेतली आणि आपला जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या तरुणाला वाचवले.

महिलेने दुसऱ्या तरुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला वाचवता आले नाही. शुक्रवारी सकाळी दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाचे पीएम करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

तरुणाचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांनी महिलेला रोख बक्षीस दिले आहे. महिलेने आपल्या कर्तृत्वातून नारीशक्ती काय असते हे दाखवून दिलं. महिला अशा समाजाची आहे ज्या समाजावर नेहमीच गुन्हेगारी कृत्याचे आरोप केला जातात. मात्र या महिलेने स्वत:ची आणि दहा महिन्यांच्या बाळाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून बुडणाऱ्या दोन तरुणांपैकी एकाला वाचवले. त्यानंतर पोलिसांना फोन करूनही माहिती दिली. तरुणाचे प्राण वाचवणाऱ्या महिलेला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.

हे प्रकरण भोपाळमधील नझिराबाद पोलीस स्टेशन परिसरातील आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी बीपी सिंह यांनी सांगितले की, राजू अहिरवार (25) हा कढैयाकला गावात राहत होता. तो शेती करत होता. गुरुवारी तो त्याचा साथीदार जितेंद्र अहिरवार याच्यासोबत खजुरिया गावात असलेल्या शेतात कीटकनाशक फवारणीसाठी गेला होता. दिवसभर काम करून दोघेही सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतत होते. दुपारनंतर परिसरात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे कढैयाकला ते खजुरिया दरम्यान असलेला ओढा ओव्हरफ्लो झाला होता. यावेळी दुसऱ्या बाजुला असलेल्या लोकांनी दोघांनाही ओढा पार करण्यापासून रोखले. मात्र त्यांनी ऐकलं नाही.

दोन्ही तरुण नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना बाजुलाच राहात असलेली रबिना हे सर्व दृश्य पाहत होती. रबिनाच्या काखेत 10 महिन्यांचे बाळ होते. त्याचवेळी दोघे तरुण नाला ओलांडताना पाण्यात वाहून गेले. हे पाहताच रबिनाने आपल्या बाळाला जमिनीवर बसवले आणि नाल्यात उडी घेतली. यादरम्यान तिने बुडणाऱ्या जितेंद्रला पकडून बाहेर ओढले. मात्र राजू पाण्यात वाहून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरले; तीन दिवसात गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटींचे नुकसान

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT