Crime News esakal
देश

Crime News : ड्रममध्ये कोंडून ४ पोटच्या लेकरांची केली हत्या अन् स्वतःही घेतला गळफास; कारण...

रोहित कणसे

राजस्थानच्या बाडमेर येथे एका महिलेने तिच्या चार मुलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २८ वर्षीय महिलेने आपल्या चार मुलांना ड्रममध्ये बंद केलं, यादरम्यान श्वास कोंडून मुलांचा मृत्यू झाला. यानंतर महिलेने देखील आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री बाडमेर जवळील बनियावास गावातील आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतले.

पोलिस आधिकारी कमलेश गहलोत यांनी या प्रकरणाबद्दल दिलेल्या माहितीनुसार गळफास घेत आत्महत्या करण्याआधी महिलेने आपल्या तीन मुली आणि एका मुलास स्टीलच्या ड्रममध्ये बंद केलं होतं. ज्यामुळे मुलांचा श्वास कोंडल्याने मृत्यू झाला. तसेच या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिला. पोलिसांनी सांगितले की, या घटनेवेशी मृत महिलेचा पती घरात नव्हता. तो मजूर असून घटनेच्या वेळी तो कामावर गेला होता.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये कुठल्यातरी कारणावरून भांडण झालं होतं आणि त्यामुळेच महिलेने मुलांची हत्या केली आणि स्वतः आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृच झालेल्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना माहिती देण्यात आली असून औपचारिक तक्रार दाखल करण्याची वाट पाहिली जात आहे. तसेच मृतदेहाचे पोर्टमार्टम केलं जाईल तसेच महिलेच्या पतीची देखील चौकशी करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT