Air India Case esakal
देश

Air India Case : 'त्या' दिवशी विमानात महिलेनेच सीटवर केली लघुशंका; आरोपीची...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः एअर इंडियाच्या विमानात एका महिलेच्या अंगावर लघवी केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात आज पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्राच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करावी, अशी मागणी केली.

कोर्टासमोर हजर केल्यानंतर आरोपी शंकर मिश्राने आपण असं काहीही केलं नसल्याचं म्हटलं आहे. त्याने सांगितलं की, तक्रारदार महिलेनेच स्वतःच्या अंगावर लघवी केली होती. त्याच्या या जबाबाने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचाः सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

पोलिसांनी कोर्टाकडे आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. पटियाला हाऊस कोर्टाने पुन्हा मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर सुनावणीसाठी पाठवलं आहे. मागच्या शनिवारी मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप शंकर मिश्रावर आहे. बुधवारी कोर्टाने त्याला जामीन देण्यास नकार दिला होता. यावेळी त्याला जामिनावर सोडणं योग्य नसल्याचं मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट यांनी स्पष्ट केलं होतं.

यापूर्वी शंकरला त्यांच्या कंपनीनं कामावरून काढून टाकलं होतं. पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनाही बोलावलं होतं. त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Marathi News Live Updates : उद्यापासून दोन दिवस नाशिकला ‘येलो अलर्ट’

Tax Amendment Bill 2026: UPI, NEFT आणि RTGS सह डिजिटल पेमेंट्समध्ये काय बदल होणार? पाहा 10 मोठे अपडेट्स एका क्लिकमध्ये

IND vs SL Warm UP Match: केएल राहुल करतोय टीम इंडियाचे नेतृत्व, मग शुभमन गिलला नेमकं काय झालं? BCCI ने दिली माहिती

BJP Leader Arrest : माजी खासदार डॉ. हिना गावितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं! भाजप नेत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, मुलगा अन् PA सह चौधरी जाळ्यात

SCROLL FOR NEXT