Orissa High Court marathi news Orissa High Court marathi news
देश

मद्रास HC : महिला स्वइच्छेने वेगळी झाल्यास 'नंतर' पोटगीसाठी दावा करू शकत नाही

सकाळ डिजिटल टीम

मद्रास - कौटुंबिक वादाच्या प्रकरणात, मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जर पत्नीने स्वइच्छेने वेगळे राहण्यास सुरुवात केली आणि घटस्फोटाच्या वेळी तिने पोटगीची मागणी केली नाही, तर ती नंतर पोटगीसाठी दावा करू शकत नाही. (madras hc news in Marathi)

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भरत चक्रवर्ती यांनी महिलेची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. तसेच तिला पोटगी मागण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात महिलेने उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती.

महिलेने दरमहा एक लाखाच्या पोटगीची मागणी केली होती. यासोबतच तिने आपल्या 35 वर्षीय आजारी मुलाच्या उपचारासाठी 5.80 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र कौटुंबिक न्यायालयाने तिची पोटगीची याचिका फेटाळली होती. त्यात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून त्यांना पोटगी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका महिलेने दाखल केली होती.

या प्रकरणातील दुसरी याचिका पतीच्या वतीने दाखल करण्यात आली होती. कौटुंबिक न्यायालयाने मुलाच्या उपचारासाठी पतीने दरमहा 80 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला पतीने आव्हान दिले होते. पतीनुसार रक्कम ८० हजारहून दरमहा २० हजार करावी असं म्हटलं होतं. मुलगा रिफ्रेक्टरी सीझर डिसऑर्डरशी झुंज देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samudra Manthan: पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील 'समुद्र मंथन' योजना काय आहे? ८४ हजार कोटींच्या खर्चाला सरकारची मंजुरी

Commonwealth Games 2026: दे दणा दण... पोरींनी जिंकली २ सुवर्ण! प्रीती पवार, जैस्मिन यांचा गोल्डन पंच; तिहेरी उडीत रौप्य व कांस्य...

Abhijit Dipke Health : अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली; पत्रकारांशी संवादाआधीच उलटी, डॉक्टरांकडून घरी तपासणी

Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्स आणि पाकिस्तानच्या कर्णधाराने मैदानावर एकमेकींना मारली मिठी; नेमकं काय घडलं? VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT