woman teacher elopes with class viii school boy at gujrat 
देश

शिक्षिकेचे जडले आठवीच्या वर्गातील मुलावर प्रेम अन्...

वृत्तसंस्था

अहमदाबाद (गुजरात): एका वर्गशिक्षिकेचे आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही पळून गेले असून, विद्यार्थ्याच्या वडिलांनी गांधीनगर जिल्ह्यातील कालोल पोलिस तक्रार दाखल केली आहे.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रारीमध्ये शिक्षिकेवर फूस लावून मुलाला पळल्याचा आरोप केला आहे. शिक्षिका 26 वर्षांची असून, विद्यार्थी 14 वर्षांचा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शिक्षिका आणि विद्यार्थ्यामध्ये वर्षभरापासून घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. दोघांमधील नात्याबाबत शाळेत चर्चा सुरू झाली होती. यामुळे शाळा प्रशासनाने दोघांना समज दिली होती. शिवाय, मुलगा लहान असल्याचेही सांगितले होते. परंतु, शुक्रवारी (ता. 17) दोघेही घर सोडून निघून गेले आहेत. वर्गशिक्षिका विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची ही दुर्मिळ घटना आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.'

विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'मी संध्याकाळी सात वाजता घरी आलो, त्यावेळी मुलगा घरामध्ये नव्हता. मुलगा चार वाजता घराबाहेर पडल्याचे पत्नीने सांगितले. मुलाचा आम्ही शोध घेतला. परंतु, तो आढळून आला नाही. शिक्षिकेच्या घरी गेल्यानंतर दोघेही तिथने नव्हते. अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT