women and two child death due to mobile blast at karur tamilnadu 
देश

मोबाईलचा स्फोट; आईसह दोन मुलांचा मृत्यू

वृत्तसंस्था

चेन्नई (तामिळनाडू): चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. मुथूलक्ष्मी (29), आणि रणजीत (वय तीन) आणि दक्षित (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. करुरमध्ये येथे खळबळजनक घटना घडली.

मुथूलक्ष्मी या मोबाईल चार्जिंगला लावलेला असतानाही मोबाईलवरही बोलत होत्या. बोलणे बंद झाल्यानंतर त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावलेल्या अवस्थेत तसाच ठेवला. पण, काही वेळातच मोबाईलचा स्फोट झाला. स्फोट एवढा मोठा होता की यामध्ये मुथूलक्ष्मी यांच्यासह त्यांची मुले गंभीर जखमी झाली. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. तिघांच्या मृत्यूने परसिरता खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुथूलक्ष्मी यांचे सहा वर्षांपूर्वी बाळकृष्ण यांच्यासोबत विवाह झाला होता. दोघे जेवणाचे स्टॉल चालवून कुटुंबाचा खर्च भागवत होते. पण, कर्ज वाढल्याने बाळकृष्ण कुटुंबाला सोडून दुसरीकडे राहात होते. त्यानंतर मुथूलक्ष्मी या दोन्ही मुलांचा सांभाळ करत होत्या. लॉकडाऊनमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. काटकसर करून त्या मुलांना सांभाळत होत्या. पण, स्फोटामुळे तिघांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे करुर गावात शोकाकूल वातावरण आहे. या घटनेचा पुढील तपास करुर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT