mucormycosis  
देश

चिंताजनक! कोरोनाची लक्षणं नसताना महिलेला ‘काळी बुरशी’

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाची कोणतीही लक्षणे (corona symptoms) नसताना एका महिलेला काळी बुरशी (म्युकर मायकोसिस) mucormycosis झाल्याचे एक प्रकरण बिहारमध्ये समोर आले आहे.

पाटणा- कोरोनाची कोणतीही लक्षणे (corona symptoms) नसताना एका महिलेला काळी बुरशी (म्युकर मायकोसिस) mucormycosis झाल्याचे एक प्रकरण बिहारमध्ये समोर आले आहे. या महिलेवर सध्या पाटण्यातील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आरा जिल्ह्यातील एका चाळीस वर्षीय महिलेला सुमारे २० दिवसांपूर्वी ताप आला होता. औषधाच्या दुकानातून तापावरील औषध आणून तिने ते घेतल्यानंतर तिचा लगेचच ताप गेला. यानंतर या महिलेला श्‍वास लागणे, डोळे दुखणे असा कोणताही त्रास लागला नाही, की रुग्णालयात भरती होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे तिने कोरोनाची चाचणीही केली नाही. मात्र, दोन दिवसांनंतर तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग दुखू लागला आणि त्या भागातील डोळ्याने दिसणेही बंद झाले. तिचे डोळे सुजले. ऑक्सिजनची आवश्‍यकता किंवा अतिदक्षता विभागात नसलेल्या या महिलेमध्ये दिसलेल्या या लक्षणांमुळे डॉक्टरही चक्रावले आणि त्यांनी सिटी स्कॅन केला असता काळी बुरशी झाल्याचे आढळले. (women got mucormycosis without having corona symptoms)

यानंतर या महिलेला ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले. या महिलेला इतर कोणता आजारही नव्हता. या महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सर्व नागरिकांना, विशेषत: मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. शरीरात प्रतिकार शक्ती कायम राहिल, याकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, देशात काळी बुरशी (म्युकर मायकोसिस)ची प्रकरणे वाढत आहे. कोरोनातून सावरलेल्या लोकांना या आजाराची लागण होत आहे. पण, आता लक्षणं नसलेल्या महिलेलाही काळी बुरशी झाल्याचे समोर आल्याने चिंता वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT