देश

VIDEO: घ्या कोरोनाचा प्रसाद! यूपीतील गावांमध्ये कोरोनामाईची पूजा

विनायक होगाडे

लखनौ : कोरोना संसर्गाबरोबरच आता देशातील अंधश्रद्धा देखील वाढू लागल्या असून यूपीतील अनेक गावांमध्ये कोरोनामाई देवीची पूजा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या पूजाअर्चेत खेडूतांबरोबरच सुशिक्षित मंडळी देखील सहभागी होताना दिसतात. अनेक महिलांनी स्वतःच्या शेतामध्येच कोरोनामाईचे देवालय उभारले असून सकाळी उठल्यापासूनच काही मंडळी पूजा साहित्य घेऊन शेतांमध्ये धाव घेत असल्याचे दिसून आले आहे. देवीच्या मूर्तीवर तेल, दुधाचा अभिषेक केला जात असून पूजा करणारी मंडळी तिथे आलेल्या अन्य भक्तांना देखील मोठ्या श्रद्धेने प्रसादाचे वाटपही करतात. या देवीसाठी गुरुवारी विशेष कार्यक्रम आणि पूजाविधीचेही आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी काही महिला या शेकडो किलोमीटर अंतर चालत दुसऱ्याच्या शेतामध्ये जातात , अशी माहिती स्थानिकांनी दिली. प्रतापगड जिल्ह्यातील पट्टी मुकूनपूर, कोशंबी आणि अमेठी ही गावे या निमित्ताने चर्चेत आली आहेत. (Women Praying To Corona Mai To Cure People Of COVID In Uttar Pradesh)

लोकांनी नदीत उड्या मारल्या

कोरोना प्रतिबंधक लशीबाबत आज देखील सर्वसामान्यांमध्ये विविध गैरसमज प्रचलित असल्याची बाब उघड झाली आहे. बाराबंकी जिल्ह्यातील सिसोऱ्हा खेड्यामध्ये लसीकरणासाठी आलेले अधिकारी पाहून काही ग्रामस्थांनी चक्क शरयू नदीमध्येच उड्या मारल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती रामनगर तहसीलचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी राजीवकुमार शुक्ला यांनी दिली.

याआधी तमिळनाडूमध्ये देखील अशीच घटना समोर आली आहे. कोईमतूर जवळील इरुगुर येथे कोरोना देवीचे मंदिर बांधण्यात आले आहे. कामाच्छीपुरी अधीनम मठाने कोरोना देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मंदिराचे प्रमुख शिवलिंगेश्वरार यांनी सांगितले की, प्लेग, साथीच्या रोगांपासून लोकांचे संरक्षण व्हावे म्हणून अशा मुर्ती तयार करण्याची मठाची परंपरा आहे. दीड फुटांची ही मुर्ती संगमरवराची आहे. आता ४८ दिवस आम्ही विशेष प्रार्थना करू. सांगतेच्या दिवसी महायज्ञही केला जाईल. त्यावेळी कोरोना निर्बंधांमुळे भाविकांना मात्र मंदिरात प्रवेश नसेल. तमिळनाडूत अशी अनेक मंदिरे आहेत. कोईमतूरमध्ये प्लेग मरीअम्मन मंदिर आहे. तमिळनाडूमधील कोईमतूरमध्ये कोरोना देवी नावाची देवी स्थापन करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या हाहाकारामध्ये हे मंदिर उभारण्यात आलं आहे. कामाचीपुरी अधिनम मठाकडून या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. प्लेग मरीअम्मन मंदिराप्रमाणेच हे मंदीर असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atala Masjid: भिंतीवर त्रिशूळ, फुले? जौनपूरमधील अटाला मंदीर की मशीद? हिंदुंनी गाठलं कोर्ट, काय आहे संपूर्ण प्रकरण

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT