amit shah narendra modi file photo
देश

'भाजपमध्ये जाऊन मोठी चूक केली'

नामदेव कुंभार

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सरकार स्थापन केलं. असं असले तरिही येथील राजकीय वातावरण अद्याप तापलेलंच आहे. यातच भाजप नेत्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून भाजपमध्ये प्रवेश करुन चूक केल्याची कबूली दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या महिला आमदाराची सध्या सोशल मीडियाव चर्चा सुरु आहे. टीएमसीमधून चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना शनिवारी पत्र लिहिलं आहे. 'भाजपात प्रवेश करून चूक केली, दिदीशिवाय जिवंत राहू शकत नाही,' असं सोनाली यांनी आपल्या पत्रात म्हणत घरवापसी करण्याची विनवणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपत दाखल झाले होते. आमदार खासदार आणि स्थानिक नेत्यांनीही ममतांची साथ सोडली होती. मात्र, सर्व आव्हानांचा सामना करत ममतांनी सरकार स्थापन केलं. निवडणुकीच्या आधी सोनाली गुहा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सोनाली गुहा यांना ममतांच्या अतिशय विश्वासू म्हटलं जात होतं. टीएमसीकडून सोनाली गुहा यांनी चार वेळा आमदारपद भूषावलं होतं. आता सोनाली गुहा पुन्हा टीएमसीच्या वाटेवर आहेत. तसं पत्र लिहून आपल्याला पक्षात घेण्याची विनवणी केली आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. त्याची मला जाणीव होत आहे. तिथे मला नेहमीच वेगळं असल्याची जाणीव झाली. भाजपनं फक्त माझा वापर केला. ममतांची बदनामी करण्यास सांगितलं, पण मी असं केलं नाही. मी पुन्हा एकदा ममतांची भेट घेणार आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या घरी जाईन, असंही सोनाली गुहा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT