work four days week esakal
देश

नोकरदार वर्गासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

येणाऱ्या नव्या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

सकाऴ वृत्तसेवा

येणाऱ्या नव्या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

नवीन वर्ष (2022) सुरु व्हायला आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. येणाऱ्या नव्या वर्षाच्या सुरवातीला अनेक बदलही होणार आहे. ज्याचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होणार आहे. नोकरदार वर्गांना केंद्रसरकारच्या या निर्णयाचा परिणाम त्यांच्या सुट्ट्या आणि कामाच्या वेळेवर होणार आहे. केंद्र सरकार (Central Government) नवीन वेतन संहिता लागू करणार आहे. येणाऱ्या नव्या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. पण अशा तरतुदी नवीन वेतन संहितेत देण्यात आलेल्या असल्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या पगारदार वर्ग, मिल, कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांवर मोठा परिणाम होणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांचे पगार (Employee salaries) आणि कामाची वेळ (Working hours) यामध्ये बदल होणार आहेत.

नवीन वेतन संहितेनुसार कार्यालयीन कामाची वेळ 12 तासांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय (Ministry of Labor and Employment) यांच्या म्हणण्यानुसार प्रस्तावित कामगार संहितेत आठवड्यातून 48 तास काम करण्याचा नियम लागू होईल, असेही म्हटले आहेत. नोकरदार वर्ग जर 12 तास काम आणि तीन दिवस सुट्टी या नियमांवर काही युनियन्सनी प्रश्न उपस्थित केले होते. ऑफीसमध्ये 12 तास काम आणि सुट्टीच्या नियमांवर संघटनानी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकारने त्यावर आपले स्पष्टीकरण दिलेले आहे. यावेळी सरकारने म्हणाले की, आठवड्यामध्ये 48 तास काम करण्याचा नियम लागू होईल. तसेच नवीन नियमांचा सर्वात मोठा फायदा ओव्हरटाइमशी संबंधित आहे. तसेच जर तु्म्ही 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केले तर कंपनीला ओव्हरटाईम (Overtime) द्यावा लागणार आहे.

या नवीन कामगार संहितेच्याबाबतीत 13 राज्यांनी मसुदा नियम जारी केलेले आहेत. तसेच केंद्र सरकारने (Central Government)कामगार कायद्याला अगोदरच अंतिम स्वरुप दिले आहे. परंतु तरीही राज्यांनी स्वत:च्या वतीने नियम बनवण्याची गरज आहे. नव्या वेतन संहितेनुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढून 12 तासांपर्यत वाढणार आहे. तर आठवड्यामध्ये 48 तास कामाचे नियम अबाधित राहणार आहे. त्यामुळे रोज 12 तास काम केल्यास आठवड्यामध्ये तीन दिवस रजा मिळेल. तर आठ तास काम केल्यास आठवड्यातील सहा दिवस काम करावे लागेल. त्यामुळे कामाचे तास वाढले तरीही तीन दिवस रजेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT