World Cup Final 
देश

World Cup Final: पनवती नंतर आता 'पापी'; ममता बॅनर्जींची नाव न घेता मोदींवर खोचक टीका

Sandip Kapde

World Cup Final: विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या पराभवावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषकाचा सामना कोलकाता किंवा मुंबईत खेळवला गेला असता तर भारत जिंकला असात, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

"भारतीय संघाने विश्वचषकातील सर्व सामने जिंकले, ज्यात 'पाप्यांनी' भाग घेतला होता तो वगळता," अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

विश्वचषकाचा अंतीम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. यावर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदी स्टेडियमवरील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. त्यामुळे सर्व खेळाडू, प्रेक्षक निराश झाले होते. भारतीय संघ यावर्षी विश्वचषक विजयाचा प्रमुख दावेदार असल्याचे मानले जात होते. कारण भारताने उपांत्य फेरीपर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये नेत्रदीपक आणि जवळपास एकतर्फी विजय नोंदवले होते.

अहमदाबाद येथील अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यामुळे नाव न घेता  ममता बॅनर्जी यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनीही सरकारवर क्रिकेटचे भगवेकरण केल्याचा आरोप केला होता. भाजप संपूर्ण देश भगव्या रंगात रंगवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. सरावादरम्यान भारतीय संघाला भगव्या रंगाची जर्सी घालण्याची गरज नाही म्हणून खेळाडूंनी विरोध केला, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. भारताने सामन्यादरम्यान परिधान केलेल्या जर्सीचा रंग निळा, तर सरावाच्या वेळी ड्रेस भगवा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT