pm modi google
देश

'मिट्टी बचाओ आंदोलना'त पंतप्रधान मोदी होणार सहभागी

आज सकाळी ११ वाजता विज्ञान भवनात या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : आज पर्यावरण दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या मिट्टी बचाओ आंदोलनात पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. आज सकाळी ११ वाजता विज्ञान भवनात या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.

(World Environment Day)

'मिट्टी बचाओ आंदोलन' हे वैश्विक आंदोलन असून जागतिक पातळीवर मातीची होत असलेली धूप आणि बिघडतं आरोग्य कसं सुधारता येईल यावर चर्चा केली जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकांना संबोधित करणार आहेत.

मार्च २०२२ मध्ये सद्गुरू यांनी या आंदोलनाची सुरवात केली होती. ज्यांनी २७ देशांत १०० दिवसांची मोटारसायकल यात्रा सुरू केली होती. त्यामध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षणाची जनजागृती केली होती. आज त्या यात्रेचा आज ७५ वा दिवस आहे. पंतप्रधान मोदी यांचा सहभागामुळे मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 'पर्यावरणासाठीची जिवनशैली' या विषयावर करून नवीन अभियानाची सुरूवात करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी 'ग्लोबल कॉल फॉर पेपर्स'ची सुरूवात केली जाणार आहे. त्याद्वारे जगभरातील लोकांना पर्यावरणाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आव्हान केलं जाणार आहे. यासाठी शिक्षक, विद्यालये आणि संशोधन संस्थाकडून कल्पना मागवण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या कार्यक्रमाला बिल गेट्स हे उपस्थित राहणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs SL 2ndT20I : झिम्बाब्वेने इतिहास रचला, श्रीलंकेला १४.२ षटकांत हरवले; सिकंदर रझाने सूर्यकुमार, विराटचा विक्रम मोडला

गणेशभक्तांनो निश्चिंत व्हा! गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंचा जनसागर, मुंबई लोकलने आखली विशेष रणनीती

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मुंबईत दुपारी ३.०० वाजेपर्यंत २,१९८ गणेश मूर्तींचे विसर्जन

Pune Ganesh Visarjan 2025 : चाकण परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी चार जणांचा दुर्दैवी बळी

Latest Maharashtra News Updates : इचलकरंजीत सकाळ माध्यम समुहातर्फे तंदुरूस्त बंदोबस्त उपक्रम

SCROLL FOR NEXT