World Toilet Day 2022 Esakal
देश

World Toilet Day 2022: गोष्ट टॉयलेट म्युझियम; कुठे आहे टॉयलेट म्युझियम?

आज 19 नोव्हेंबर आजचा दिवस हा वर्ल्ड टॉयलेट डे म्हणून साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

Sulabh International Museum: आतापर्यंत तुम्ही सुलभ शौचालयं अनेक पाहिली असतील पण मात्र कधी सुलभ शौचालय म्युझियम पाहिलं आहे का, म्युझियम आणि तेसुद्धा चक्क शौचालयाचं. तुम्हाला हे वाचून सुरुवातीला थोडं विचित्रच वाटेल. 

आतापर्यंत तुम्ही ऐतिहासिक वस्तु तसेच महापुरुषांच्या आठवणीतले ,पुस्तकाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे म्युझियम तुम्ही पाहिले असतील, त्यांना भेट दिली असेल मात्र टॉयलेट म्युझियमला  जाणं दूर तुम्ही कदाचित ऐकलंही नसावं. असं म्युझियम म्हणजे परदेशात वगैरे असेल असंच वाटेल. मात्र असं म्युझियम भारतातच आहे. हे मला दिल्लीत गेल्यावर माहिती पडलं. आज 19 नोव्हेंबर आजचा दिवस हा वर्ल्ड टॉयलेट डे म्हणून साजरा केला जातो. चला तर मग आजच्या लेखात आपण टॉयलेट म्युझियमविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या...

भारतातील स्वच्छतेला चालना देण्याच्या प्रयत्नात सुलभ शौचालय हे संपूर्ण देशात कार्यरत आहे. सुलभ आंतरराष्ट्रीय समाजसेवा संस्था स्थापन करणारे बिंदेश्वर पाठक यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या संस्थेनंच 1992 मध्ये एक अनोखं असं सुलभ आंतरराष्ट्रीय शौचालय संग्रहालय (म्युझियम) देखील स्थापित केलं आहे. हे म्युझियम नवी दिल्लीतील महावीर एन्क्लेव्हच्या परिसरात आहे. 

म्युझियमचा मांडणी कशी आहे?

या म्युझियमचे वैशिष्ट्ये म्हणजे हे म्युझियम प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन मुख्य विभागांमध्ये विभागले आहे. गेल्या पाच हजार वर्षांच्या कालखंडातील शौचालय व्यवस्थेचा विकास या संग्रहालयात दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. या म्युझियममध्ये वेगवेगळ्या कालखंडानुसार शौचालयामध्ये आलेले विविध मॉडेल प्रदर्शित केलेली आहेत. 

थोडक्यात काय तर जगभरातील स्वच्छतागृहांचा ऐतिहासिक प्रवास आपल्याला इथं पाहता येतोच पण यात शौचालयाच्या वापरावर आधारित कवितांचा संग्रह देखील ठेवण्यात आले आहेत. आधुनिक टॉयलेट पॅनच्या विकासाचीसुद्धा सविस्तर नोंद इथं केली गेली आहे. पूर्वीच्या काळातील चित्रांनी हे संग्रहालय भरलेले आहे जे आपल्याला मनुष्य स्वच्छतेकडे कसे गेले याची कल्पना देतात. 

म्युझियम मधील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी

1) म्युझियम मध्ये आपल्याला शौचालयाचं फर्निचर, प्राइव्हिज, चेंबरची पॉट्स, बायडेट्स आणि पाण्याची क्लॉसेट्स देखील आहेत.

2) म्युझियममध्ये मध्ययुगीन कमोड्सची मॉडेल्स सुद्धा आहेत  ज्यात एक ट्रेजर चेस्टच्या आकारचा आहे. 

3) तसेच रोमन सम्राटांच्या सोन्या-चांदीच्या शौचालयातील भांडी यांचेही नमुने या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.

4) या म्युझियममध्ये 1596 मध्ये सर जॉन हॅरिंग्टन नावाच्या एका दरबाराने रानी एलिझाबेथ I च्या कारकिर्दीत तयार केलेल्या फ्लश पॉटची नोंद आहे.

5) हडप्पा संस्कृतीची ड्रेनेज सिस्टम जी इ.स.पूर्व 2500 वर्षं जुनी आहेत याचंदेखील डिस्प्ले या संग्रहालयात आहेत.

6) मॉडेल्स व्यतिरिक्त जुन्या काळात अस्तित्त्वात असलेल्या सिंधू संस्कृती आणि युरोपियन देशांकडे जिथे प्रथम तंत्रज्ञान विकसित झालं तेथील स्वच्छता सिस्टमची माहिती इथं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT