Bajarang Punia_Wrestlers Protest 
देश

Wrestlers Protest: आंदोलक खेळाडूंसोबत पोलिसांकडून गैरव्यवहाराचा आरोप; पुनियानं केलं ट्रॅक्टर रॅलीचं आवाहन

शेतकरी आंदोलनाप्रमाणं आता खेळाडूंचं आंदोलन जोर पकडताना दिसत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Wrestlers Protest: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाप्रकरणी अटकेची मागणी करत खेळाडूंनी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर ठाण मांडलं आहे. पण आता हे आंदोलन चिघळलं आहे.

काल रात्री दिल्ली पोलिसांनी आंदोलक महिला खेळाडूंसोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळं खेळाडूंना अक्षरशः रडू कोसळलं.

पण या प्रकारामुळं चिडलेला आंदोलक कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं जनतेला दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्याचं आवाहन केलं आहे. (Wrestlers Protest alleged Police mishandling Bajarang Punia called for a tractor rally)

बजरंग पुनिया रात्री माध्यमांसमोर बोलताना म्हणाला की, संपूर्ण देशाची आम्हाला गरज आहे. आज सर्वांनी दिल्ली यावं. दिल्ली पोलीस आंदोलकांवर जबरदस्ती करत आहे, आई-बहिणीवरुन शिव्या देत आहेत.

पण अद्याप यांनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काहीही कारवाई केलेली नाही. पोलीस प्रशासानाची ही परिस्थिती आहे. आपण जितके देशवासी आहात त्यांनी ट्रॅक्टर घेऊन इथं यावं दिल्लीत पोहोचावं.

बुधवारी रात्री उशीरा दिल्ली पोलिसांची आणि आंदोलकांची बाचाबाची झाली. आंदोलकांचं म्हणणं आहे की, दिल्लीत पाऊस पडत असल्यानं त्यांनी जंतरमंतर बेड मागवले होते.

पण पोलिसांनी हे बेड आंदोलनस्थळी पोहोचण्याआधीच थांबवले. त्यामुळं आंदोलनक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

यामध्ये दुष्यंत फोगाटसह दोन कुस्तीपटू जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकारानंतर साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि संगिता फोगाट या महिला खेळाडूंना रडू आवरलं नाही.

या गोंधळात कुस्तीपटू राकेश यादव याच्या डोकं फुटलं तर विनेश फोगाटचा भाऊ दुष्यंत याच्या डोक्यालाही जखम झाली आहे. या दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT