Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest esakal
देश

Wrestlers Protest : अखेर ब्रिज भूषण यांचं एक पाऊल मागे! बडबड थांबवण्यासाठी भाजप हायकमांडची कारवाई

रोहित कणसे

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनादरम्यान ब्रिज भूषण शरण सिंह यांच्यावर भाजप हायकमांडकडून कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ब्रिजभूषण यांना कुस्तीपटूंच्या बाबतीत अनावश्यक वक्तव्ये टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप हायकमांडच्या सूचनेनुसार ब्रिजभूषण यांनी ५ जून रोजी होणारी प्रस्तावित सभा देखील रद्द केली आहे. भाजपने ब्रिजभूषण यांना रॅली न घेण्यास सांगितले होते.

कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप केले गेल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह यांनी ५ जून रोजी अयोध्येत जनजागृती रॅली काढण्याची घोषणा केली होती . भाजप खासदार ब्रिज भूषण यांनी दावा केला की या रॅलीमध्ये ११ लाख लोक त्यांच्या समर्थनार्थ येतील असा दावा केला होता, मात्र शुक्रवारी (२ जून) त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे रॅली रद्द करण्याची घोषणा केली.

ब्रिजभूषण यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझ्या प्रिय शुभचिंतकांनो! तुमच्या पाठिंब्याने मी गेली २८ वर्षे लोकसभेचा सदस्य म्हणून काम केले आहे. मी सत्तेत असताना आणि विरोधात असताना सर्व जाती, समाज आणि धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. याच कारणांमुळे माझे राजकीय विरोधक आणि त्यांच्या पक्षांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत.

त्यांनी पुढे लिहिले की, सध्याच्या परिस्थितीत काही राजकीय पक्ष ठिकठिकाणी मोर्चे काढून प्रांतवाद आणि जातीय संघर्ष वाढवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण समाजात पसरलेल्या वाइट गोष्टींवर विचारमंथन करण्यासाठी ५ जून रोजी अयोध्येत संत संमेलन घेण्याचे ठरले होते, परंतु आता पोलीस हे आरोपांची चौकशी करत असून सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचा आदर करत 'जन चेतना, महारॅली, ५ जून, अयोध्या चलो' कार्यक्रम काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

पोस्टच्या शेवटी ब्रिज भूषण यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार व्यक्त करत त्यांचे कुटुंब नेहमीच ऋणी राहील, असे म्हटले आहे. ब्रिज भूषण यांची रॅली रद्द करण्याची घोषणा खाप पंचायती कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ उतरल्या नंतर घेण्यात आला आहे. गुरुवारी मुझफ्फरनगरमधील सोराम येथे सर्वजाती खाप पंचायतीनंतर शुक्रवारी कुरुक्षेत्रमध्ये महापंचायत बोलावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर खरंच BCCI चा अध्यक्ष होणार का? मास्टर ब्लास्टरची टीम म्हणते, तुम्ही जे ऐकलं आहे ते...

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

SCROLL FOR NEXT