who sakal
देश

‘डब्लूएचओ’कडून चुकीचा नकाशा प्रसिद्ध

केंद्राच्या निषेधानंतर सारवासारव; काश्‍मीरमध्ये पाकच्या कोरोनाचा डेटा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आपल्या संकेतस्थळावर भारताचा धडधडीत चुकीचा नकाशा टाकून जम्मू-काश्मीरला पाकिस्तान व अरूणाचल प्रदेशाला चीनचा भाग दाखविल्याचे उघड झाल्यावर भारताने याला जोरदार हरकत घेतली. त्यावर ‘डब्लूएचओ’ने या पोर्टलवर खुलासेवजा माहिती प्रकाशित केली आहे.

परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत लेखी प्रशानाला उत्तर देताना ही माहिती दिली. मुळात डब्लूएचओचा हा खोडसाळपणा तृणमूल कांॅग्रेसचे खासदार डॉक्टर शांतनू सेन यांच्या सर्वप्रथम लक्षात आला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तत्काळ पत्र लिहिल्यावर भारताने या घोडचुकीबद्दल ‘डब्लूएचओ’चे कान पकडले. कोरोना काळात अनेक देशांना मदत करणाऱ्या भारताच्या तीव्र आक्षेपातील ‘गांभीर्य’ लक्षात येताच या आरोग्य संघटनेने चुकीची दुरूस्ती करणारा खुलासा प्रसारीत केला.

डॉ. सेन यांनी सांगितले की कोरोना काळात डब्लूएचओ कोविड१९ डॉट इन हे संकेतस्थळ आपण वरचेवर पहात असतो. एकदा ते उघडल्यावर त्यात भारताच्या जम्मू-काश्मीरवर क्लिक केले तेव्हा तेथे निळ्या रंगाच्या एका भागात पाकिस्तानचा कोरोना डाटा दिसला. अरुणाचल प्रदेशावर क्लिक करताच तेथे चीनचा डाटा दिसला. हा आक्षेपार्ह प्रकार असल्याने आपण पंतप्रधानांना पत्र लिहिले.

डॉ. सेन यांच्याच प्रश्नाच्या उत्तरात मुरलीधरन यांनी सांगितले की भारताच्या आक्षेपानंतर डब्लूएचओने (who)खुलासा केला आहे. चुकीची दुरूस्तीही केली आहे. देशाच्या सीमांबद्दल भारत सरकारचे धोरण कायम सुस्पष्ट असते व देशाच्या नकाशातील फेरफार कोणत्याही स्थितीत अस्वीकारार्ह असल्याचे देशाचे धोरणही ठाम आहे. ताज्या प्रकाराबद्दल जिनिव्हातील डब्लूएचओ मुख्यालयातील भारतीय अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले. त्यावर या संघटनेने केलेल्या खुलाशात म्हटले आहे की या संकेतस्थळावरील माहिती व चित्रे हे डब्लूएचओचे मत नाही. अनेक देशांच्या नकाशांवरील (maps)भाग, त्यातील ठिपके व सीमारेषा यांच्याबाबत अद्याप पूर्ण सहमती होऊ शकलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझी अटक बेकायदेशीर'' वाल्मिक कराडचं नेमकं म्हणणं काय? उज्ज्वल निकमांनी गैरसमज दूर केला

Latest Marathi News Live Updates : उपनगरात पावसाने घेतली उसंत, मुंबईकरांना काहीसा दिलासा

Asia Cup 2025 : सूर्यकुमार यादवसह ८ खेळाडू ठरले, ७ खेळाडूंवरून घोडे अडले! गौतम गंभीर, अजित आगरकरच्या घोषणेकडे लक्ष

Sarfaraz Khan Century: कसोटी संघातून वगळले, त्या सर्फराजने खणखणीत शतक झळकावून निवड समितीला उत्तर दिले

Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी

SCROLL FOR NEXT