Yashwant sinha, uddhav thackeray and Narendra Modi  
देश

मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरेंवर दबाव आणला; सिन्हांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (droupadi murmu and yashwant sinha news in marathi)

सिन्हा म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी दबावाखाली द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी भाग पाडल्याचे सिन्हा यांनी म्हटलं. गुवाहाटी येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की, त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप आणि एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देईल.

शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या उद्धव ठाकरे यांना यांना काही दिवसांपूर्वीच सत्तेवरून पायउतार केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, आपण कोत्या मनाचे नाहीत. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचं हेच कारण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होते. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे.

संघर्षाचा भाग म्हणून आपण राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास तयार झालो. वैयक्तिकरित्या, द्रौपदी मुर्मू यांचा आदर करतो, पण त्या कोणत्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात ते पाहा, असं सिन्हा यांनी नमूद केलं. तसेच आपल्याला मूक राष्ट्रपती हवे आहेत का? आपण राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर राजकारण्यांविरोधात वापरल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर थांबेल. केंद्रीय संस्थांचा वापर करूनच देशातील सरकारला अडचणीत आणले जात असून महाराष्ट्रातील सरकार देखील अशाच पद्धतीने पाडल्याचं सिन्हा यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT