yediyurappa said above 150 seats for won by bjp in assembly in bangalore 
देश

भाजपला आगामी विधानसभेत 150 जागा जिंकून देण्याचं ध्येय : CM येडीयुरप्पा

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला १५० पेक्षा अधिक जागा जिंकून देण्याचे उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी रविवारी (३) केला. ग्रामपंचायतीत पक्षाने चांगले यश मिळविल्याचा दावा करून आता तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकांची तयारी सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची विशेष सभा शिमोगा येथील पीईएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी कॅम्पसमध्ये सुरु झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी कॅम्पसवर पक्षाचा झेंडा फडकावून गो-पूजन केले. गायींच्या कत्तलीवर बंदी घालणारा अध्यादेश काढल्याबद्दल पक्ष कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व पक्षाच्या इतर नेत्यांचा सत्कार केला.

यावेळी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, ‘‘राज्यातील जनतेच्या आशीर्वादाने भाजप पक्ष सत्तेत आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या समर्थक उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. आमचे उद्दिष्ट विधानसभा निवडणुकीत १५० जागांवर विजय मिळविण्याचे आहे.’’

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या वेळी ग्रामस्वराज्य अधिवेशन घेण्यात आले होते. राज्यात आता तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ११, १२ आणि १३ जानेवारी रोजी जनसेवक यात्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
तीस जिल्ह्यांत एकूण पाच संघ जनसेवक यात्रेमध्ये भाग घेतील. पहिल्या संघाचे नेतृत्व अध्यक्ष नलीनकुमार कटील करतील, तर दुसऱ्या संघाचे नेतृत्व मंत्री के. एस. ईश्वरप्पा करणार आहेत.

तिसऱ्या संघाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ आणि चौथ्या संघाचे नेतृत्व जगदीश शेट्टर करणार आहेत. पाचव्या संघाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री अश्वत्थ नारायण यांच्याकडे असेल. याव्यतिरिक्त जनसंवाद यात्रा काढण्यात येणार असून यात अनेक मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

गोहत्याबंदीचे स्वप्न साकार

प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी, गोहत्या बंदी हे पक्षाचे स्वप्न होते. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने हे स्वप्न साकार केले आहे, असे गौरवोद्‌गार काढले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT