Ramdev baba
Ramdev baba Google file photo
देश

अ‍ॅलोपॅथीप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य; रामदेव बाबांची सुप्रीम कोर्टात धाव

कार्तिक पुजारी

अ‍ॅलोपॅथी औषधांसंबंधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने योगगुरु बाबा रामदेव अडचणीत सापडले आहेत. बाबा रामदेव यांनी आता सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले असून त्यांच्याविरोधात अनेक राज्यांत दाखल करण्यात आलेले एफआयआर यांना स्थगिती देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

नवी दिल्ली- अ‍ॅलोपॅथी औषधांसंबंधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने योगगुरु बाबा रामदेव अडचणीत सापडले आहेत. बाबा रामदेव यांनी आता सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले असून त्यांच्याविरोधात अनेक राज्यांत दाखल करण्यात आलेले एफआयआर यांना स्थगिती देण्याची विनंती त्यांनी केली आहे. रामदेव यांनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी अॅलोपॅथी औषधी प्रभावी नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. असोसिएशनकडून विविध राज्यात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. (Yoga proponent Ramdev moves SC seeking stay of proceedings in multiple FIRs lodged against him remarks against allopathy)

बाबा रामदेव यांनी सुप्रीम कोर्टात दिलेल्या याचिकेत म्हटलंय की, 'मेडिकल असोसिएशनने पाटणा आणि रायपूरमध्ये दाखल केल्या एफआयआरवरील कारवाईला स्थगिती द्यावी आणि या सर्व एफआयआर दिल्लीत ट्रान्सफर कराव्यात.' बाबा रामदेव यांनी केलेलं वक्तव्य त्यांना चांगलेच भोवताना दिसत आहे. केंद्र सरकारनेही बाबा रामदेव यांना या मुद्द्यावरुन सुनावलं होतं. कोरोना काळात डॉक्टर दिवसरात्र आपली सेवा देत आहे. अशावेळी बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन आरोग्य कर्मचाऱ्यांचे धैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करु नये, असं डॉ. हर्षवर्धन म्हणाले होते.

रामदेव नक्की काय म्हणाले होते?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा म्हणाले होते की, कोरोना महामारीमुळे होत असलेल्या मृत्युमागे अ‍ॅलोपॅथीचं कारण सांगण्यात येत आहे. अॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्युंपेक्षा अधिक मृत्यू हे अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत.

अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे, असे मी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या मेसेजवरून बोललो होतो. आधी रेमडेसिव्हिर फेल ठरलं, प्लाझ्मा थेरपी बंद करण्यात आली, असं वक्तव्य रामदेव बाबांनी केलं होतं. त्यावरून आयएमएने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी खडसावल्यानंतर रामदेव बाबांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं होतं. पण, यानंतर रामदेव यांनी पुन्हा एकदा IMA आणि फार्मा कंपन्यांना (Farma companies) टार्गेट केलं यांना खुलं पत्र लिहित रामदेव यांनी थेट २५ प्रश्न विचारले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT