देश

JNU Violence : योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की (व्हिडिओ)

पीटीआय

नवी दिल्ली : स्वराज अभियान पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांना "जेएनयू'बाहेर धक्काबुक्की करण्यात आली. अभाविपच्या गुंडांनी ही धक्काबुक्की केल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी केला आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) आज रात्री पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला. काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध केला आहे. 

त्यानंतर योगेंद्र यादव यांनादेखील धक्काबुक्की करण्यात झाली. त्यावर ते म्हणाले, पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. त्यांना जर एवढी भीती वाटत असेल, तर त्यांनी आपली वर्दी उतरवून ठेवावी.' तसेच गुंडांना थोपविण्यासाठी तिथे कोणीही उपस्थित नव्हते. या गुंडांनी मला बोलू दिले नाही, असा आरोपही यादव यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

Madhuri Mahadevi Elephant Hearing : निराशा! ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

Sanjay Gandhi: ज्योतिषाने म्हटलेलं, संजयची जीवनरेषा छोटी आहे; चामुंडेच्या पुजाऱ्यानेही दिला होता इशारा, इंदिरा गांधी घाबरल्या...

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट

SCROLL FOR NEXT