Yogi Adityanath Team eSakal
देश

‘...ते अन्न घेऊन अन्नदातांचे हितचिंतक असल्याचा आव आणताय’

जे गुन्हेगार आणि दहशतवाद्यांशी हातमिळवणी करतात ते अन्न घेऊन अन्नदाताचे हितचिंतक असल्याचे भासवत आहेत

सकाळ डिजिटल टीम

भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्यात पुन्हा सरकार स्थापन केल्यास गुंड व गुन्हेगारांना पूर्वीप्रमाणेच शिक्षा होईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी म्हटले आहे. योगी यांनी सोमवारी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सरकार गुंडांवर पुन्हा कारवाई करेल. यासोबतच योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या ‘अन्न संकल्पा’वरही निशाणा साधत त्यांना जिना प्रेमी म्हटले आहे.

योगी (Yogi Adityanath) यांनी ट्विट केले की, ‘मी राज्यातील जनतेला आश्वासन देतो की लोकांच्या आशीर्वादाने १० मार्च रोजी जेव्हा भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, तेव्हा ते पुन्हा पूर्वीप्रमाणे व्यावसायिक गुंड आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करेल’. २०१७ मध्ये सत्तेत आल्यानंतर योगी सरकारने गुन्हेगारांवर अत्यंत कडक कारवाई केली होती. मोठ्या प्रमाणात चकमकी झाल्यानंतर अनेक फरार गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले. मोठ्या प्रमाणात झालेल्या चकमकींना खोटे ठरवत अखिलेश यादव (Akhilesh Yadav) अनेकदा ‘ठोकी सरकार’ म्हणत त्यांना घेरतात.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आणि म्हटले की, जे दंगलखोर, गुन्हेगार आणि दहशतवाद्यांशी हातमिळवणी करतात ते आज हातात अन्न घेऊन अन्नदाताचे हितचिंतक असल्याचे भासवत आहेत. प्रतिकूल हवामानापेक्षा त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या दंगलींमुळे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले हे राज्याला माहीत आहे. हे फक्त ‘जिना प्रेमी’ आहेत.

सिंचनासाठी ३०० युनिट मोफत

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीत (assembly Eleciton) भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी आणि त्यांना हुसकावून लावण्यासाठी ‘अन्न संकल्प’ घेत अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यावर सर्व पिकांसाठी केवळ एमएसपीच नव्हे तर सिंचनासाठी ३०० युनिट मोफत देण्याची घोषणा केली जाईल. शेतकऱ्यांसाठी वीज आणि पेन्शन आणि विम्याची तरतूद केली जाईल. याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी सरकारकडे आल्यानंतर १५ दिवसांत अदा करण्यात येणार असून, त्यासाठी शेतकरी रिव्हॉल्व्हिंग फंड तयार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : दरवर्षी सारखी जुहू चौपाटीवर गर्दी नाही

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT