Yogi Adityanath Sakal
देश

माया २०० पट वाढली; योगी आदित्यनाथ यांचा घणाघात

सपाचे दुखणे मी समजू शकतो. एखाद्याची संपत्ती २०० पट वाढल्याची कल्पना आपण करू शकतो का?

सकाळ वृत्तसेवा

मथुरा : सपाचे दुखणे मी समजू शकतो. एखाद्याची संपत्ती २०० पट वाढल्याची कल्पना आपण करू शकतो का? सपाची सत्ता असताना मात्र तसे घडल्याचे दिसून आले, असे प्रत्यूत्तर देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी प्राप्तीकर खात्याच्या धाडींचे समर्थन केले.

मथुरा येथे जाहीर सभेत जन विश्वास यात्रेला त्यांनी निशाण दाखविले. शनिवारी सपाच्या काही पदाधिकारी आणि नेत्यांच्या मालमत्तांवर छापे घालण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर योगी यांनी आपल्या दाव्यात कुणाचेही नाव घेतले नाही. राजकीय विरोधकांना जेरबंद करण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर केल्याचा आरोप त्यांनी धुडकावून लावला.

या धाडींमुळे समाजवादी पक्ष दुखावल्याचे मला दिसले. त्यामुळे मी कुणाला तरी कारण विचारले. त्यावर एक पत्रकार म्हणाला की, ज्याच्या मनाला आपण दोषी असल्याचे कळून चुकले आहे त्याच्यावर आरोप करण्याची गरज नसते.

यात्रांच्या माध्यमातून संपूर्ण राज्य ढवळून काढण्याचा संकल्प भाजपने सोडला आहे. त्यासाठी सहा नेत्यांनी सहा ठिकाणांहून जन विश्वास यात्रा काढल्या आहेत.

१) योगी आदित्यनाथ ः गोवर्धन ते पिलीभीत

२) जे. पी. नड्डा ः आंबेडकर नगर ते लखनौ

३) राजनाथ सिंह ः झाशी ते कानपूर

४) नितीन गडकरी ः बिज्नौर ते रामपूर

५) शिवराजसिंह चौहान ः बलिया ते बस्ती

६) स्मृती इराणी ः गाझीपूर ते अमेठी

समाजवादी पक्ष सत्तेत असताना गुन्हेगार आणि गुंडांविरुद्ध कारवाई झाली असती का? हे लोक तुमचे मत मिळण्याच्या पात्रतेचे आहेत का?

- योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT