rakesh sachan  
देश

योगी सरकारमधील मंत्री शिक्षा सुनावण्यापूर्वीच फाईलसह कोर्टातून फरार; FIR दाखल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री राकेश सचान यांच्यावर शिक्षेची फाईल घेऊन कोर्टातून पळून गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शनिवारी कानपूर न्यायालयाने सचान यांना एका प्रकरणात दोषी ठरवले होते. मात्र न्यायालय शिक्षा सुनावण्यापूर्वीच मंत्री आपल्या वकिलाच्या मदतीने दोषी ठरवण्याच्या आदेशाची मूळ प्रत घेऊन फरार झाले. (yogi cabinet minister rakesh sachan absconded from kanpur court)

एवढेच नाही तर जामीनपत्र न भरताच ते कोर्टरूममधून पळून गेले. आता न्यायालयाच्या सादरकर्त्याने मंत्र्यांविरुद्ध पोलिसांत एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दिली आहे. 1991 मध्ये तत्कालीन समाजवादी पक्षाचे नेते राकेश सचान यांच्याकडून पोलिसांनी अवैध शस्त्र जप्त केले होते. याप्रकरणी त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात (७२९/१९९१) शनिवारी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी-३, कानपूर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. यादरम्यान कोर्टाने सचान यांना दोषी ठरवले.

राकेश सचान यांना दोषी सिद्ध करून शिक्षा सुनावण्याची तयारी कोर्ट करत होते. यापूर्वी बचाव पक्षाला शिक्षेवर वाद सुरू करण्यास सांगितले होते. मात्र जेव्हा राकेश सचान दोषी ठरवण्याची आदेशाची फाईल घेऊनच कोर्टातून गायब झाले. यानंतर संपूर्ण न्यायालयात आणि पोलीस-प्रशासनात खळबळ उडाली.

दुसरीकडे, दुपारी राकेश सचान यांना आजारपणामुळे घेऊन गेल्याचे वकिलांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच राकेश सचान यांनी गुपचूप कोर्टरूममधून बाहेर पडल्याचा आरोप फेटाळून लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamuna Expressway Accident: मध्यरात्री धुक्यात अचानक आगीचा भडका… क्षणात पेटल्या ८ बस-कार; प्रवासी जीवंत जळाले... रात्रीचा थरारक क्षण

Solapur Crime:'विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ'; वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, जन्मठेपेची शिक्षा अन्..

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

SCROLL FOR NEXT