rakesh sachan  
देश

मंत्र्याचा प्रताप; मोदींच्या वाढदिवशी फोटोला चढवला हार; नेटकरी करतायत ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

लखनौ - उत्तर प्रदेशचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री राकेश सचान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला हार घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा आहे.

यूपी सरकारचे मंत्री राकेश सचान एका कार्यक्रमाला हजर होते. त्यावेळी एका टेबलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो ठेवण्यात आला होता. राकेश सचान यांनी एक मोठा हार उचलला आणि तो पीएम मोदींच्या फोटोला अर्पण केला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे लोक मंत्र्यांवर जोरदार टीका करत आहेत.

एका पत्रकाराने व्हिडिओ शेअर करत लिहिले की राकेश सचान एक अद्भुत मंत्री आहेत, त्यांना पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करायचा होता. पण फोटोवर हार डढवला. फोटोला हार चढवण्याचा अर्थ तुम्हाला माहिते आहे का, असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला.

व्हिडीओवर एका वापरकर्त्याने लिहिले की, हे यूपी सरकारचे कॅबिनेट मंत्री आहेत. न्यायालयाने त्यांना एका प्रकरणात दोषी ठरवले, त्यानंतर ते कोर्टातून पळून गेले होते. त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली, पण त्यांचं मंत्रीपद अबाधित आहे.

एका युजर्सने लिहिलं की, मंत्री सपामध्ये होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर तिथून ते भाजपमध्ये आले आहेत. त्यांचे संस्काराचे शिक्षण कच्चे आहे. हळूहळू त्यांना शिकवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT