youth and bull double seat traveling on bike video viral 
देश

Video: आई शपथ! बैलालाच बसवले दुचाकीवर...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दुचाकीवरून कुत्रे, मांजर किंवा कोंबड्या प्रवास करताना दिसतात. पण, दुचाकीवर बैल कधी बसलेला पाहिला का? उत्तर नाही असेल. एक व्हिडिओ व्हायरल होत असून, यामध्ये एका दुचाकीवरून चक्क बैल प्रवास करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका युवकाने दुचाकीवर आपल्यासोबत डबलसीट म्हणून चक्क बैलाला बसवले आहे. बैलाचा तोल जाऊ नये अथवा तो हलू नये म्हणून त्याला बांधण्यात आले आहे. दुचाकीवर बैल शांतपणे बसून प्रवासाचा आनंद घेत आहे. दुचाकीचालक पण पडण्याची भिती न बाळगता वाहन चालवत असल्याचे पाहायला मिळते. प्रवासादरम्यान अनेकजण त्यांच्याकडे पाहताना दिसतात. एका मोटारीमधील नागरिकाने संबंधित क्षण कैद करून व्हिडिओ व्हायरल केला आहे. पण, हा व्हिडिओ नेमका कोणत्या भागातील आहे, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. युवकाचा बैलावर आणि बैलाचा युवकावर किती विश्वास आहे, हे पाहायला मिळते. बैल जागचा हलत नाही तर युवक सराईतपणे वाहन चालवत असल्याचे पाहायला मिळते, याला विश्वास म्हणतात, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT