youth helping poor man in metro video viral 
देश

माणूसकीचे दर्शन घडविणारा व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: कोरोनाच्या काळात माणूस माणसापासून दूर जात असून माणूसकी विसरत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. पण, माणूसकीचे दर्शन घडविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स एका युवकाचे कौतुक करत आहेत.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी माणूसकीचे दर्शन घडविणारा व्हिडिओ ट्विटरवरून व्हायरल केला आहे. फक्त 59 सेंकदाचा व्हिडिओ आहे. पण, हा व्हिडिओ खूप काही शिकवून जातो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, मेट्रोमध्ये निवस्त्र फिरणाऱ्या या वृद्ध व्यक्तीकडे अनेकजण पाहात होते. पण, मदतीला पुढे कोणी येत नव्हते. एका युवकाने आपल्या अंगातील टी-शर्ट काढून वृद्ध व्यक्तीला दिला. मात्र, ही व्यक्ती स्वत: हून टी-शर्टही घालू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर युवकाने त्यांच्या अंगात शर्ट घातला. शिवाय, आपली टोपीही घातली.

दरम्यान, मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी माणूसकीचे दर्शन पाहिल्यानंतर युवकाचे कौतुक केले. कोरोनाच्या काळात हा व्हिडिओ खूप काही शिकवून जात असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT