10th & 12th Board Preparation Know how to study Science in Boards
10th & 12th Board Preparation Know how to study Science in Boards  
एज्युकेशन जॉब्स

10th & 12th Board Preparation: विज्ञानाचा अभ्यास कसा करावा? विद्यार्थ्यांनो, जाणून घ्या काही टिप्स आणि ट्रिक्स 

अथर्व महांकाळ

नागपूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सर्वाधिक कठीण वाटणारा विषय म्हणजे विज्ञान. अनेक विद्यार्थ्यांना हा विषय समजतच नाही अशी त्यांची तक्रार असते. तर काही विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी या विज्ञानाच्या तीन शाखांमधील फरक समजून घेण्यासही अडचण होते. मात्र विद्यार्थ्यांनो परीक्षा म्हटलं की विज्ञानाचा पेपर लिहावा लागणारच. पण आता चिंता करू नका. बोर्डाच्या परीक्षेसाठी विज्ञानाचा अभ्यास नक्की कसा करावा? याबद्दल आज आम्ही तुम्हाला टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला विज्ञान हा विषय कधीच कठीण वाटणार नाही आणि चांगले मार्क्स मिळू शकतील. चला तर मग जाणून घेऊया. 

फिजिक्स (भौतिकशास्त्र)

फिज़िक्समध्ये नेहमीच महत्वपूर्ण आणि फोर्मुलांच्या आधारावर प्रश्न विचारले असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच अभ्यास करताना हे फॉर्मुले आणि सिद्धांत यांच्यासह उत्तर लिहिण्याच सराव केला पाहिजे. 

फिजिक्स या विषयात जितकं महत्व तुमच्या उत्तरला आहे तितकंच महत्त्व त्या उत्तरातील आकृतीला आहे. त्यामुळे आकृतीला मार्क्सही असतात. म्हणूनच प्रश्न कुठलाही असो त्यामध्ये आकृती काढायला आली असेल तर नक्की काढा. यासाठी अभ्यास करताना दररोज सर्व आकृत्या काढून बघा. यामुळे तुम्हाला अधिक मार्क्स मिळू शकतात. तसंच एखाद्या प्रश्नाचं उततर येत नसेल मात्र आकृती आठवत असेल तर परीक्षेच्या वेळी पेपरमध्ये आकृती नक्की काढा. यामुळे तुम्हाला निम्मे मार्क्स मिळू शकतात.    

न्यूमरिकल्सचा अभ्यास करताना नेहमी सोडवून बघा. फिजिक्समधील अनेक प्रश्नांमध्ये न्यूमरिकल्स विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा सराव नक्की करा. 

महत्वाची गोष्ट म्हणजे मागील काही वर्षांच्या पेपरचा अभ्यास करा आणि ते सोडवून बघा. यामुळे तुम्हाला तुमच्या पेपर पॅटर्नचा अनुभव येईल आणि नेहमी विचारले जाणारे प्रश्न समजतील. काही अडचण असल्यास आपल्या शिक्षकांना जरूर विचारा. 

केमेस्ट्री (रसायनशास्त्र)

केमेस्ट्री हा विषय सार्वधिक मार्क्स मिळवून देणारा विषय आहे. यामध्ये रासायनिक समीकरणे बॅलेन्स करण्याच्या पद्धती तुम्हाला माहिती असल्यास तुम्हाला मार्क्स मिळवणं कठीण होणार नाही. 

केमेस्ट्री हा विषय पूर्णतः पिरियॉडिक टेबलवर अवलंबून आहे. जर तुम्हाला याबद्दल सर्व काही माहिती असेल तरच तुम्ही केमेस्ट्रीमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता. त्यामुळे पिरियॉडिक टेबल लक्षात ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा. 
 
विज्ञानाचा पेपर सोडवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. अभ्यास करताना आणि काही जुने पेपर सोडवून बघताना तुम्हाला लागणाऱ्या वेळेची नोंद ठेवा. यामुळे तुम्हाला परीक्षेत वेळेत पेपर लिहिता येईल. 

बायोलॉजी (जीवशास्त्र) 

अनेकदा विद्यार्थ्यांना हा विषय सर्वाधिक कठीण वाटतो. याचं प्रमुख कारण म्हणजे या विषयात असणाऱ्या मोठमोठ्या आकृत्या, धडे आणि काही जीवांची कठीण नावं. विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यास अडचण होते. अनेकदा विद्यार्थी गोंधळून जातात. मात्र चिंता करू नका हा विषयसुद्धा चांगले मार्क्स मिळवून देऊ शकतो. 

बायोलॉजीचा अभ्यास करताना कधीही कुठलं उत्तर एकदा वाचून सोडून देऊ नका. उत्तर वाचल्यानंतर ते समजून घेण्यासाठी २ ते ३ वेळा वाचा. जर तुम्हाला उत्तर समजलं तर तुम्ही ते कधीच विसरणार नाही;

तसंच मोठ्या आकृत्या लक्षात ठेवण्यासाठी त्या वारंवार कागदावर काढून बघा. त्यामधील नावं मेमोनॉमिक्स पद्धतीनं लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला कधीच आकृत्या काढण्यास अडचण येणार नाही. 

अभ्यास करताना बायोलॉजीमधील जीवांची मोठमोठी नावं लक्षात ठेवण्यासाठी ती एका कागदावर लिहून घराच्या दारांवर, भिंतीवर किंवा तुमच्या अभ्यासाच्या खोलीत लावून ठेवा. येता जाताना सतत ही नावं मोठ्यानं वाचत राहा. यामुळे तुम्हाला ही नावं पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील. 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करताना कधीच पोपटपंची करू नका. विज्ञान हा विषय पाठ करण्याचा नाही तर समजून घेण्याचा आहे. त्यामुळे कधीच पोपटपंची न करता नीट समजून आणि रिव्हिजन करून पेपर लिहा. यश नक्की मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT