Thane 12th Result esakal
एज्युकेशन जॉब्स

Thane 12th Result : ठाण्याचा बारावीचा निकाल लागला 92.08 टक्के; निकालात 'इतक्या' टक्क्यांची वाढ, यंदाही मुलींचीच सरशी

2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 520 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

२१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ठाणे जिल्ह्यातील १९८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली होती.

ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा ठाणे जिल्ह्याचा (Thane 12th Result) निकाल 92.08 टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.

2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 520 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 89 हजार 935 विद्यार्थी (Students) ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात यंदा 3 टक्क्यांची वाढ झाली असून, मागील वर्षी जिल्ह्यात बारावीचा निकाल 88.90 टक्के एवढा लागला होता.

२१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ठाणे जिल्ह्यातील १९८ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली होती. जिल्ह्यातून एक लाख ७ हजार ५२० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 89 हजार 935 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 45 हजार 655 मुले तर 44 हजार 280 उत्तीर्ण मुलींचा समावेश आहे.

जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावी परीक्षेच्या निकालामध्ये मुलींचीच सरशी दिसून आली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी 94.07 टक्के एवढी असून, मुलांचा निकाल 90.23 टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुरबाड तालुक्याचा सर्वाधिक 98.01 टक्के निकाल लागला असून, शहरी भागात नवी मुंबई महानारपालिका क्षेत्राचा निकाल सर्वाधिक 93.07 टक्के एवढा लागला आहे.

तालुकानिहाय निकाल

क्षेत्र टक्केवारी

  • कल्याण ग्रामीण 96.05

  • अंबरनाथ 92.49

  • भिवंडी 89.18

  • मुरबाड 98.01

  • शहापूर 92.80

  • ठाणे मनपा 92.41

  • नवी मुंबई 93.70

  • मीरा भाईंदर 93.49

  • कल्याण डोंबिवली 90.12

  • उल्हासनगर 90.80

  • भिवंडी मनपा 91.60

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT