Railway jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

उत्तर रेल्वेमध्ये अप्रेंटिसची भरती! ITI, डिप्लोमा उमेदवारांना संधी

उत्तर रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांची भरती! आयटीआय, डिप्लोमाधारक उमेदवारांना संधी

श्रीनिवास दुध्याल

रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आयटीआय, डिप्लोमाधारक उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे.

सोलापूर : रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आयटीआय (ITI), डिप्लोमाधारक उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. उत्तर रेल्वेने (Northern Railway) हजारो अप्रेंटिस (Apprentice) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अप्रेटिस पदांच्या एकूण 3093 जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 20 सप्टेंबरपासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्‍टोबर 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आरआरसी उत्तर रेल्वेच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतात.

या तारखा लक्षात ठेवा

  • अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची तारीख : 20 सप्टेंबर 2021

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्‍टोबर 2021

अप्रेंटिस पदांसाठी ही आहे पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

या पदांसाठी वयोमर्यादा

उत्तर रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी जारी केलेल्या अधिसूचनेत उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे, असे नमूद करण्यात आले आहे.

अर्जासाठी शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

अशी होईल निवड प्रक्रिया

उत्तर रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व उमेदवारांचे हायस्कूल आणि आयटीआय गुण एकत्र करून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. जे प्रक्रिया पूर्ण करतील त्यांची निवड केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT