Kolhapur Agriculture Department Farmer Scheme esakal
एज्युकेशन जॉब्स

Agriculture Department : कृषी विभागात 'इतकी' पदं रिक्त; शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याने तीव्र नाराजी

शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.

कुंडलिक पाटील

जिल्ह्यात ४ लाख ४४ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र असून, ६ लाख ७५ हजार इतके शेतकरी (Farmer Scheme) आहेत.

कुडित्रे : जिल्हा कृषी अधीक्षक पद पुन्हा प्रभारी झाले आहे. सेवानिवृत्त झालेले जिल्हा कृषी अधीक्षक फक्त पाच महिन्यांसाठी पदावर होते. जिल्ह्यातील कृषी विभागात (Agriculture Department) ३२८ पदे रिक्त असून, गावात काम करणाऱ्या कृषी सहायकांची ९८ पदे रिक्त आहेत.

यामुळे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ४ लाख ४४ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र असून, ६ लाख ७५ हजार इतके शेतकरी (Farmer Scheme) आहेत. कृषी विभागात ८१७ पदे मंजूर असताना कोविड काळापासून दोन वर्षे ४८९ कर्मचाऱ्यांवर कृषी खात्याचा कारभार आहे.

गेल्या वर्षी ३०८ पदे रिक्त होती. यामधील पदे भरण्याऐवजी पुन्हा वीस पदे रिक्त झाली. जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे गेल्यावर्षी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षकपद प्रभारी होते. यानंतर दत्तात्रय दिवेकर यांनी फक्त पाच महिन्यांसाठी कार्यभार सांभाळला.

यानंतर आता पुन्हा हे पद प्रभारी झाले असून, या ठिकाणी अरुण भंगारदिवे हे प्रभारी कृषी अधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी राधानगरी, शाहूवाडी, कागल अशा ठिकाणी तालुका कृषी अधिकारी व विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आहे. नवीन कारभारी येईपर्यंत ते खाते सांभाळणार आहेत.

रब्बीच्या तोंडावर

तीन ते पाच गावांसाठी एक कृषी सहायक असून, पीक सल्ला घेणे किंवा खते, बी-बियाणे याबाबत सल्ला घेण्याबाबत शेतकऱ्यांत रब्बीच्या तोंडावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी होत आहे.

दृष्टिक्षेपात...

  • जिल्ह्यात १२२९ गावे

  • सहा लाख ७५ हजार खातेदार शेतकरी

  • कृषी सहायक ९८ व कृषी पर्यवेक्षक ३८ पदे रिक्त

  • तीन ते पाच गावांचा एका कृषी सहायकावर भार

  • ५०० गावांत कृषी सहायक नसल्याचे चित्र

  • राष्ट्रीय कृषी विकास योजनेत प्रस्तावच नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT