Horoscope 
एज्युकेशन जॉब्स

बालक-पालक : अगं अगं राशी!

अभिजित पेंढारकर

‘आई, तुझी रास काय आहे गं?’’ कन्यारत्नानं पेपरमध्ये घातलेलं डोकंही वर न काढता विचारलं, तेव्हा आईला धक्काच बसला.
‘तुम्ही दोघं माझ्या राशीला आला आहात, एवढंच मला माहितेय!’ असंच उत्तर खरंतर आईला द्यायचं होतं; पण तिनं मोह आवरला.
‘सांग ना!’ कन्यारत्न पुन्हा चिरकलं, तेव्हा मात्र आईला उत्तर द्यावंच लागलं. मुळात आपली नववीतली मुलगी आज कधी नव्हे ते पेपर उघडून बसली आहे, याचाच तिला अतिशय आनंद झाला होता.
आईनं रास सांगितली.

‘पूर्ण आरामाचा दिवस. सगळ्या गोष्टी आयत्या हातात मिळतील,’ मुलीनं तिचं भविष्य वाचून दाखवलं आणि ते ऐकून, नुकतीच दाढी करून हॉलमध्ये आलेले बाबाही दचकले. पुढच्या संकटाची त्यांना चाहूल लागली होती.

‘तसंही गेल्या कित्येक दिवसांत मी कामाला सुटी घेतली नाहीये. आज माझा सुटीचा दिवस. सगळी कामं तुम्ही तिघांनी करायची. जा...तुझ्या भावाला उठव जा जरा..!’ आईनं लगेच सूचना केली आणि बाबांचा अंदाज खरा ठरला. आईनं मग पटापट पुढच्या कामांचीही यादी केली. तशीही ती सुटीच्या दिवशी अशा कामांची यादी करायची आणि कुणाकुणाला नेमून द्यायची, पण त्यातली निम्मी पुन्हा तिच्याच गळ्यात पडायची. आज मात्र असं काही घडणार नव्हतं. पेपरमधल्या राशिभविष्याची साथ मिळाल्यामुळे तिच्या संकल्पाचं दृढसंकल्पात रूपांतर झालं होतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवसभर आईनं खरंच सुट्टी घेतली. सकाळीच मावशीनं इडली सांबार पाठवलं होतं, त्यामुळं दुपारच्या जेवणाची सोय झाली. आईनं सुटी टाकल्यामुळं बाबांनाच कुकर लावावा लागला. कुठलंही आंदोलन संध्याकाळपर्यंत आटोपतं, तसं आईचं सुट्टी आंदोलनही आटपेल, असाच अंदाज घरच्यांना होता; पण आईनं ‘पूर्ण दिवस’ हे अगदीच मनावर घेतल्याचं जाणवलं.

संध्याकाळ झाली तरी ती किचनकडं फिरकेना की कुठल्या कामात लक्ष घालेना, तेव्हा परिस्थिती जरा गंभीर झाली. उर्वरित मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आणि काही खलबतं झाली.

रात्रीच्या जेवणात बुंदी रायता, मटर पनीर आणि व्हेज पुलाव बघून तर आई अवाकच झाली. संध्याकाळपासून तिघांना किचनमध्ये खुडबूड करताना तिनं बघितलं होतं, पण त्याचं असं गोड फलित मिळेल, याची तिला अजिबात कल्पना नव्हती.

‘मस्त झाला बरं का, आजचा बेत! तुम्ही माझं भविष्य अगदी खरं केलंत!’ भरपेट जेवण झाल्यावर सुपारीचा आस्वाद घेत आई म्हणाली.
‘तुझं नाही, मी माझं भविष्य खरं केलं!’ बाबा म्हणाले.
‘म्हणजे?’ आईनं न समजून विचारलं.

माझ्याही राशिभविष्यात ‘आज चविष्ट पदार्थ खाण्याचा योग,’ असं लिहिलेलं होतं. म्हटलं, स्वतः स्वयंपाकाचे प्रयोग करून तोंडाची चव बिघडवण्यापेक्षा बाहेरूनच मागवावं. आम्ही तिघांनी मेनू निश्चित केला आणि मागवलं!’ बाबांनी खुलासा केला.
आईलाही अंदाज आला होताच. तिला दिवसभर सगळ्या कामांना आराम मिळाल्याचा आनंद जास्त होता.
‘बाबा, बाय द वे, ‘आज’ चविष्ट खाण्याचा योग म्हणजे? रोज चविष्ट खात नाही का तुम्ही?’ तेवढ्यात शेंडेफळानं नसती शंका काढली आणि बाबांना त्यांच्या दुसऱ्या दिवशीचं भविष्य स्पष्ट दिसू लागलं!
(लेखक पटकथा व संवादलेखक आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Female Doctor: साताऱ्यातील महिला डॉक्टर आणि पोलिसाची ओळख कशी झाली? गुन्ह्यातील 'तो' दुसरा आरोपी कोण? मोठी माहिती समोर

Guru Transit 2025: गुरु उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश; 'या' राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Jr Hockey World Cup: पाकिस्तानची आशिया कपपाठोपाठ भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमधूनही माघार! बदली संघाची होणार घोषणा

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात बंद; सेन्सेक्स 340 अंकांनी खाली, कोणते शेअर्स घसरले?

सायली-अर्जुनापेक्षा हटके आहे Reel Life सासूची खरी लव्हस्टोरी ! वर्षभर पाहिलेली होकाराची वाट

SCROLL FOR NEXT