एज्युकेशन लोन व व्हिसासाठी संघर्ष! अखेर "त्याने' अमेरिकेत पाय रोवलेच
एज्युकेशन लोन व व्हिसासाठी संघर्ष! अखेर "त्याने' अमेरिकेत पाय रोवलेच Sakal
एज्युकेशन जॉब्स

एज्युकेशन लोन-व्हिसासाठी संघर्ष! अखेर 'त्याने' अमेरिकेत पाय रोवलेच

प्रकाश सनपूरकर

अमेरिकेतील शिक्षणासाठी भारतात "या' तरुणाला नाना समस्यांना सामोरे जावे लागले.

सोलापूर : अमेरिकेतील (America) शिक्षणासाठी (Education) भारतात 'या' तरुणाला नाना समस्यांना सामोरे जावे लागले. भारतात शैक्षणिक लोन (Education Loan) तर मंजूर झाले नाहीच, मात्र अमेरिकेतील शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्यानंतर भारतातून व्हिसाही (VISA) मंजूर होण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बॅंकांचा (Bank) एज्युकेशन लोनला नकार, दोनदा नामंजूर झालेला व्हिसा... अशा अटीतटीच्या संघर्षातून बाळगी (ता. दक्षिण सोलापूर) च्या (Solapur) रोहित पाटील (Rohit Patil) याने अखेर अमेरिकेत शिक्षण घेऊन करिअरला सुरवात केली व तेथे आपले भक्कमपणे रोवले.

रोहितने त्याचे प्राथमिक शिक्षण बाळगीच्या जिल्हा परिषद शाळेत मराठी माध्यमात घेतले. त्यानंतर त्याने पुढील शिक्षण हरिभाई देवकरण प्रशालेत घेतल्यानंतर व्हीव्हीपी पॉलिटेक्‍निकमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका मिळवली. दहावीला असतानाच विदेशात जाण्याचे ठरवून त्याने पासपोर्ट तयार केला. विदेशात जाण्यासाठी त्याने ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील स्टडी ऍट ऍब्रॉड सेलची माहिती घेत अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला. सुरवातीपासून त्याने अमेरिकेत रिसर्च बेस्ड शिक्षणाची संधी घेण्याचे ठरवले अन्‌ अटीतटीच्या संघर्षानंतर अखेर त्याने अमेरिकेत पाय रोवलेच

असा केला संघर्ष...

मित्राकडे अमेरिकेतील शिक्षणासाठी विचारणा केली तर निदान 40 लाख रुपयांची गरज होती. एज्युकेशन लोनची तयारी केली. पण बॅंकांनी शेतीच्या भरवशावर एज्युकेशन लोन देण्यास नकार दर्शवला. आता एवढी रक्कम कशी जमवावी म्हणून रोहितने अमेरिकेतील एका व्हेंडर कंपनीला संपर्क केला. कागदपत्रे तपासून या कंपनीने कर्ज मंजूर केले. मात्र हे कर्ज डॉलरमध्ये असल्याने ते महागडे ठरणार होते. कर्जाचा प्रश्‍न मिटल्यानंतर रोहितने व्हिसा मागण्यासाठी अर्ज केला. तेव्हा व्हिसा अधिकाऱ्यांनी तुम्हाला शेतीच्या भरवशावर व्हिसा देता येणार नाही असे सांगितले. रोहितचे ऍडमिशन देखील झाले होते. दुसऱ्यांदा रोहितने व्हिसासाठी अर्ज केला. पुन्हा हातात कर्ज मंजुरीचे पत्र असूनही व्हिसा अधिकाऱ्यांनी व्हिसा नाकारला. आता मात्र गंभीर स्थिती झाली. डॉलरमध्ये घेतलेल्या कर्जाचे व्याज, महाविद्यालयातील गैरहजेरी या दोन्ही संकटात तो सापडला. त्याने सरळ ऑर्किड महाविद्यालयात जाऊन प्रा. डॉ. श्रीनिवास मेतन यांच्यासमोर ही स्थिती मांडली. तेव्हा त्यांनी कोलकता येथे व्हिसासाठी अर्ज करण्याची सूचना केली. रोहितने तत्काळ कोलकता गाठले. कोलकत्याच्या अधिकाऱ्यांनी फक्त शिक्षणाच्या खर्चाचे नियोजन काय केले हे विचारताच रोहितने कर्ज मंजुरीचे पत्र दाखवले. मग तत्काळ त्याला व्हिसा मिळाला.

अखेर त्याच्यासाठी अमेरिकेचे दरवाजे उघडल्यावर तो अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात दाखल झाला. मग मात्र त्याच्या बाजूने स्थिती बदलली. सुरवातीलाच त्याला एक चांगली स्कॉलरशिप मंजूर झाल्याने त्याच्या कर्जाचा भार कमी झाला. लगेच उन्हाळी सुटीसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्याला एका कंपनीत नोकरीची ऑफर आली. हीच नोकरी कायम झाली तर पुढील पॅकेजमधून त्याचे कर्जाचे सर्वच प्रश्‍न आता सुटण्याची आशा निर्माण झाली.

ठळक बाबी...

  • व्हिसा शेती उत्पन्नाच्या बाबत अडचणी

  • अमेरिकेतील कंपनीने देऊ केले शैक्षणिक कर्ज

  • स्कॉलरशिपच्या मदतीने खर्च झाला कमी

  • उन्हाळी सुटीतच जॉब करण्याची संधी

  • अमेरिकेत राहूनच करिअर मजबूत करण्याचे स्वप्न

आईवडिलांचे पाठबळ व व्हिसा काढण्याच्या अडचणीत मिळालेले मार्गदर्शन यामुळेच अमेरिकेत शिक्षण घेण्याची हिंमत करू शकलो. आता पुढील संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे यशाचे समाधान मिळते आहे.

- रोहित पाटील, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन (अमेरिका)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT