Airforce Agniveer Recruitment 2022
Airforce Agniveer Recruitment 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

Airforce Agniveer : हवाई दलात 'अग्निवीर' होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा

सकाळ डिजिटल टीम

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दलात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय.

Airforce Agniveer Recruitment 2022 : अग्निपथ योजनेअंतर्गत (Agneepath Scheme) भारतीय हवाई दलात (Indian Air Force) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. या रिक्त पदांद्वारे अग्निवीर वायुच्या पदांवर (Indian Airforce Agniveer Vayu) भरती केली जाईल. ही भरती नुकत्याच सुरू झालेल्या अग्निपथ योजनेवर आधारित असतील. दरम्यान, ज्या उमेदवारांना यामध्ये अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइटवर indianairforce.nic.in किंवा agnipathvayu.cdac.in जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अग्निवीर वायुच्या पदांवरील रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया 24 जून 2022 पासून सुरू झालीय. यामध्ये उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 जुलै 2022 पर्यंत मुदत देण्यात आलीय. या रिक्त पदांसाठी परीक्षा 24 जुलै 2022 रोजी घेतली जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये रिक्त पदांचे संपूर्ण तपशील पाहू शकतात.

अग्निवीर वायु परीक्षेचा तपशील

या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची (MCQ) असेल. यात विज्ञान विषय आणि विज्ञान विषय सोडून इतर विषय निवडणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा एकाच सिस्टीमवर घेतली जाईल. या संदर्भात भारतीय हवाई दलानं एक अधिसूचना जारी केलीय. ऑनलाइन परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाईल. तर, दुसरीकडं प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी 0 गुण वजा केले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

  • विज्ञान विषय : ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 60 मिनिटे असेल आणि 10+2 CBSE अभ्यासक्रमानुसार इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित यांचा समावेश असेल.

  • विज्ञान विषयांव्यतिरिक्त : यासाठी ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 45 मिनिटे असेल. त्यात 10+2 CBSE अभ्यासक्रम आणि इंग्रजीचा समावेश असेल.

  • विज्ञान विषय आणि विज्ञान विषयांव्यतिरिक्त इतर : या ऑनलाइन परीक्षेचा एकूण कालावधी 85 मिनिटे असेल. त्यात 10+2 CBSE अभ्यासक्रमानुसार इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणिताचा समावेश असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

SCROLL FOR NEXT