America esakal
एज्युकेशन जॉब्स

अमेरिकेत चांगला पगार, बोनस असूनही 43 लाख लोकांनी सोडली नोकरी

सकाळ डिजिटल टीम

सध्या अमेरिकेत (America) अनेक लोक मोठ्या संख्येनं आपल्या नोकरीचा राजीनामा देताना दिसत आहेत.

सध्या अमेरिकेत (America) अनेक लोक मोठ्या संख्येनं आपल्या नोकरीचा राजीनामा देताना दिसत आहेत. अमेरिकेतील कामगार विभागाच्या जॉब ओपनिंग आणि लेबर टर्नओव्हर सर्वेक्षणनं (JOLTS) सादर केलेल्या अहवालात म्हंटलंय की, ऑगस्ट महिन्यात नोकरी सोडणाऱ्या अमेरिकन लोकांची संख्या 43 लाख इतकी झालीय, त्यात अमेरिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी हे 2.9 टक्के (Job Resignations) लोक आहेत. याआधी एप्रिलमध्ये 40 लाख आणि मे महिन्यात 36 लाख लोकांनी नोकरीचा राजीनामा दिला होता.

दरम्यान, ऑगस्टमध्ये अमेरिकेत नवीन नोकऱ्यांची संख्या थोडीशी कमी होऊन 10.4 लाख झालीय. मात्र, हे घटते प्रमाण जुलैपासून (US Job Quit Rate) सुरु आहे. अमेरिकेत नोकरी सोडणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास गमावण्यासारखी परिस्थिती निर्माण झालीय. सखोल आकडेवारीचे परीक्षण केल्यानंतर, लोक कोरोनाला घाबरुन देखील नोकरी सोडत असल्याचं समोर आलंय.

कोणत्या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम?

वाहतूक आणि व्यावसायिक सेवांशी संबंधित क्षेत्रांवर याचा सर्वाधिक परिणाम झालाय. कोविडच्या वाढत्या प्रकरणांमध्ये ऑगस्ट महिन्यात या क्षेत्रातील 892,000 लोकांनी नोकऱ्या सोडल्या. तर, गेल्या महिन्यात ही संख्या 157,000 होती. नोकरी आणि रिक्त पदं सोडून जाणाऱ्या लोकांची वाढती संख्या ही देशाच्या आर्थिक सुधारणेत अडथळा असल्याचे दिसून येत आहे. नोकरी सोडण्याचा हा दर गेल्या दोन दशकांतील सर्वाधिक असल्याचंही म्हटलंय.

अमेरिकेत 50 लाख जागा रिक्त

कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत तब्बल 2.2 करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र, आता 50 लाख जागा रिक्त असूनही लोकांना नोकरी मिळत नाही, अशी स्थिती आहे. छोटे व्यवसाय करणारे 51 टक्के लोक म्हणतात, त्यांनी सप्टेंबरमध्ये नोकऱ्या काढल्या होत्या, परंतु ही पदं भरली जाऊ शकली नाहीत. लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या चांगला बोनस आणि जास्त पगार देत आहेत. तर, 42 टक्के लघु उद्योजकांचं म्हणणं आहे, की त्यांनी गेल्या महिन्यात पगारही वाढवला आहे. परंतु असं असून देखील लोक नोकरी सोडताना दिसत आहेृत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT