TET exam sakal media
एज्युकेशन जॉब्स

टीईटी परीक्षेसाठी करा तीन ऑगस्टपासून अर्ज

मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२१’ (TET) घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर (maharashtra state council of examination) सोपविली आहे. ही परीक्षा १० ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी येत्या मंगळवारपासून (ता. ३ ऑगस्ट) ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. (Apply for TET exam from 3rd August)

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित-विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अशा शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षकपदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेबाबत सविस्तर माहिती https://mahatet.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया तीन ऑगस्टपासून सुरू होत असून, २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती परिषदेने दिली आहे.

टीईटीचे वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी : ३ ते २५ ऑगस्ट

  • प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर

  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - एक : १० ऑक्टोबर (वेळ- सकाळी साडेदहा ते दुपारी एक)

  • शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - दोन : १० ऑक्टोबर (वेळ - दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT