एज्युकेशन जॉब्स

भविष्य नोकऱ्यांचे: कृत्रिम बुद्धिमत्तेतून पर्यावरणाचे रक्षण! 

आशिष तेंडुलकर

मागील काही भागामध्ये आपण ‘एआय’च्या विविध क्षेत्रातील उपयोगांबद्दल वाचत आहोत. आपल्या लक्षात आलेच असेल, की ‘एआय’चा विविध क्षेत्रातील वापर थक्क करून टाकणारा आहे आणि तो मनुष्याच्या सर्जनशीलतेचा एक उत्तम नमुना आहे. आज आपण असेच एक हटके उदाहरण पाहणार आहोत आणि ते आहे पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील. 

पर्यावरण संवर्धन हा आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या क्षेत्रामध्ये ‘एआय’चा वापर मुख्यत्वे वन्यजीवांची शिकार टाळण्यासाठी आणि जंगलातील झाडांची अवैध कत्तल टाळण्यासाठी केला जातो. यामध्ये प्रामुख्याने उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा आणि रेकॉर्डिंग उपकरणाद्वारे एकत्रित केलेल्या आवाजांचा वापर करून ‘एआय’ प्रारूपांद्वारे अवैध हालचालींचा मागोवा घेतला जातो आणि त्याद्वारे वन्यजीव संवर्धन साधले जाते. 

गुगल आणि अमेरिकेच्या नॅशनल ओशनोग्राफिक आणि ॲटमॉसफिअर ॲडमिनिस्ट्रेशन संस्था (एनओएए) यांनी संयुक्तपणे ‘एआय’चा वापर हम्पबॅक व्हेल माशांच्या संवर्धनासाठी केला. त्याविषयी थोडे विस्ताराने आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत! 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शास्त्रज्ञांना १९६०च्या सुमारास असे लक्षात आले, की हम्पबॅक व्हेल गातात आणि त्यांचे हे गाणे कालानुरूप उत्क्रांत होत असते. मजेची गोष्ट अशी, की व्हेलचे हे गाणे पाण्याखालून शेकडो मैलांपर्यंत ऐकू येतात. या गाण्याच्या आधाराने हे व्हेल्स एकमेकांशी संवाद साधतात, स्थलांतर करतात किंवा साथीदार शोधण्यासाठी वापरतात असा कयास आहे. त्यांच्या या संगीताच्या आधाराने आपल्याला त्यांचे संवर्धन करता येईल का, यावर गुगल आणि ‘एनओएए’ संयुक्तपणे काम करत आहेत. या व्हेलची एकूण संख्या किती आणि ते नेमके कोठे आहेत यावरून त्यांच्यावर येणाऱ्या संभाव्य धोक्यांचे निराकरण करता येणे शक्य आहे. यासाठी त्यांच्या संगीताचा वापर केला गेला. ‘एनओएए’ने २००५पासून उच्च वारंवारतेच्या ध्वनिक मुद्रिकांचा वापर करून पाण्याखालील आवाजांचे पॅसिफिक समुद्रातील १२ वेगवेगळ्या जागी मुद्रण केले. हे एकंदरीत १७०,००० तासांचे ध्वनिमुद्रण आहे! एक माणूस २४ तास हे ध्वनिमुद्रण ऐकत बसला, तर त्याला या सर्व ध्वनिमुद्रिका ऐकायला एकूण १९ वर्षे लागतील! या ध्वनिमुद्रिकांच्या आधाराने हम्पबॅक व्हेलचे संगीत शोधण्याचे सखोल मज्जासदृश्य जालीय प्रारूप विकसित करण्यात आले. पाण्याखालील आवाजांचे वर्गीकरण अतिशय किचकट स्वरूपाचे काम आहे - नानाविध आवाज जसे की जहाजे, पाऊस यांचे आवाज या प्रारूपांना गोंधळात टाकतात. याशिवाय सतत बदलणारे वातावरणही अडथळा ठरते. या ध्वनिमुद्रिकांचे छायाचित्रांमध्ये रूपांतर करण्यात आले. याला स्पेक्ट्रोग्राम असे म्हणतात आणि या स्पेक्ट्रोग्रामवरून हम्पबॅक व्हेलचे संगीत शोधण्याचे अचूक प्रारूप तयार करण्यात आले. असेच एक स्पेक्टरोग्रॅम उदाहरणादाखल खालील चित्रात दाखवण्यात आले आहे! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ही सुरुवात आहे; या ध्वनिमुद्रिकांमधून पुढे आपल्याला अनेक समुद्रीजीवांविषयी मोलाची माहिती मिळू शकेल आणि त्याचा वापर करून आपल्याला समुद्री जीवांचे संवर्धन करता येणे शक्य आहे. आपल्याला हे संगीत ऐकायचे असेल किंवा त्यावरून काही नवीन संशोधन करायचे असल्यास पुढील संकेतस्थळाला भेट द्या: 
https://patternradio.withgoogle.com/ 
आपल्याला हे व्हेलचे संगीत कसे वाटले आम्हाला जरूर कळवा. भेटूया पुढच्या आठवड्यात. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT