Radio
Radio 
एज्युकेशन जॉब्स

ऑन एअर : वस्तुनिष्ठ मूल्यमापन...

आर. जे. संग्राम, 95 बिग एफएम

सरकार म्हणजे पंतप्रधान, पार्टी म्हणजे अध्यक्ष, सिनेमा म्हणजे हिरो, क्रिकेट म्हणजे बॅट्समन, कर्तव्यदक्ष पोलिस म्हणजे आयपीए...  सगळा पैसा, प्रसिद्धी, मान, सन्मान... सगळा भाव आणि भक्ती हीच मंडळी उपभोगतात. म्हणजे आपणच मेंटल शॉर्टकट्‌स वापरून अख्याच्या एका भागाला पूर्णचा दर्जा देतो. शॉर्टकट काढायची खोड आपल्याला उत्क्रांतीच्या सुरुवातीपासून लागली आहे. रेडिओ म्हणजे फक्त आरजे नाही, हे मागच्या लेखांतून आपण बघितलं आणि साउंड इंजिनिअर, प्रोमो प्रोड्युसर, कॉपी रायटर, बाकीची क्रिएटिव्ह टीम, सेल्स टीम, मार्केटिंग टीम या माझ्या सहकाऱ्यांना भेटलो. आणखी दोन सहकारी म्हणजे हाऊसकिपिंग आणि सिक्युरिटी स्टाफ (यांना ऑफिस बॉय किंवा वॉचमन म्हणू नये. मराठी भाषा दिनाचा हँगओव्हर असल्यास फार तर यांना स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थापक म्हणा.) रेडिओ स्टेशनमध्ये या पदांची कामं इतर कुठल्याही व्यवसायाच्या ठिकाणी असतात आणि समाजात इतर जसं असतं, तसंच इथंही बहुतांश वेळा सफाई कर्मचारी हे विशिष्ट घटकातलेच असतात. 

विशिष्ट सामाजिक, आर्थिक बॅकग्राउंड असल्याशिवाय RJ ची नोकरी मिळणं अवघडच. हे माझं म्हणणं काहींना आवडणार नाही, पण हे कटू सत्य आहे. आपल्याकडं कुठल्याही खासगी नोकरीत प्रवेश करताना आडनावाचा परिणाम दिसतोच-नकळत किंवा जाणून बुजून. ‘असं असलं तरी सगळ्यांनाच नुसतं आडनावामुळं RJ बनता येतं असं नाही ना, स्ट्रगल तर ९९ टक्के लोकांना करावंच लागतं, आवडत्या क्षेत्रात तुम्ही मिळेल ती नोकरी पत्करा. एकदा त्या कंपनीत लागला की, मग आपली प्रतिभा दाखवा. कष्ट करा,’ असा सूर अनेक वेळा कानावर पडतो. रेडिओ आवडतो म्हणून तरुणानं वॉचमन किंवा हाऊसकिपिंगची नोकरी पत्करली आणि पुढं जाऊन तो RJ झाला, असं माझ्या बघण्यात तरी आलेलं नाही. पण पुढं असं होऊ शकतं का? एखादा खरंच होतकरू आणि प्रतिभावान तरुण २०२०मध्ये सगळे अडथळे पार करून शिखर गाठू शकेल का? 

मात्र, हे जवळ जवळ अशक्य आहे. कितीही कष्ट केले, पात्रता सिद्ध केली तरी. कारण मुळात पात्रता क्वचितच वस्तुनिष्ठ असते. हे समजणं आणि एका लेखात समजावणं अवघड आहे. पण या सत्यकथेतून बराच उलगडा होऊ शकेल. दोन व्हायोलीन वादक. जगप्रसिद्ध उस्ताद जोशूवा बेल. वर्षाला शेकडो कार्यक्रम, एक तिकीट सहा हजार रुपये, त्याच्या व्हायोलिनची किंमत २० कोटी रुपये! त्याच्याच वयाचा दुसरा व्हायोलीन वादक, पण रेल्वे स्टेशनवर आपली कला पेश करणारा. तेवढीच कला, तेवढीच लकब, तितकीच प्रतिभा. तेच शास्त्रीय राग वाजवतो. पण त्याला ऐकायला मात्र हजारो प्रवाशांपैकी फक्त २७ थांबून ऐकतात आणि टोटल ३२ डॉलर देतात. का? कारण लोकं घाईत असतील आणि मुळातच त्याचं वादन कितीही चांगलं असलं तरी उस्ताद बेल यांच्या एवढं नसणार. ‘इंडियन आयडॉल’मध्ये छान गाणारे शेकडो तरुण येतात, पण लता, किशोर, सोनू यांच्याजवळ नाही जाऊ शकत. पण तो दुसरा वादकही स्वतः जोशूवा बेल होता, वेश पालटून! आणि २० कोटी रुपयांचच व्हायोलीन वाजवत होता!!

या प्रयोगाचं जगभर कौतुक झालं, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राला प्युलित्झर पारितोषिक मिळालं. कुठल्याही कलेचं आणि कलाकाराचं केलेलं मूल्यमापन वस्तुनिष्ठ नसतं, हे त्यांनी सिद्ध केलं. जसं कला आणि कलाकाराचं, तसंच नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांचं - असा माझा दावा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT